मुंबई : हिंदू धर्मात कोणतंही काम करताना शुभ मुहूर्त पाहिला जातो. कारण त्या वेळी ग्रहांची स्थिती आणि नक्षत्रांची योग्य सांगड असल्याने शुभ कार्याला सुरुवात केली जाते. त्यामुळे भविष्यात कोणतंही अडचण येत नाही असा समज आहे. असं असताना प्रत्येक महिन्यात पाच दिवस अशुभ मानले जातात. या कालावधीला पंचक असं म्हंटलं जातं. या कालावधीत शुभ आणि मंगळ कार्य करणं अशुभ मानलं जातं. या महिन्यातील पंचक 2 ऑगस्टपासून सुरु होणार आहे आणि 6 ऑगस्टला संपणार आहे. 2 ऑगस्टला बुधवार असल्याने ज्योतिषशास्त्रानुसार हे पंचक अशुभ मानलं जात नाही.
हिंदू पंचांगानुसार, पंचक 2 ऑगस्टला रात्री 11 वाजून 26 मिनिटांनी सुरु होईल आणि 6 ऑगस्टला रात्री 1 वाजून 43 मिनिटांनी संपेल. पंचक कालावधीत चंद्र कुंभ ते मीन राशीत जवळपास पाच दिवस असतो. या कालावधीला पंचक म्हंटलं जातं. पाच नक्षत्रांचं मिळून पंचक तयार होतं. धनिष्ठा, पूर्वभाद्रपद, शतभिषा, उत्तराभाद्रपद आणि रेवती नक्षत्र आहे.
हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार पंचकाची वर्गवारी पाच गटात करण्यात आली आहे. पंचक कोणत्या दिवशी सुरु होते त्यावरून वर्गवारी करण्यात आली आहे. सोमवारी सुरु होणारं राज पंचक, मंगळवारचं अग्नि पंचक, शुक्रवारचं चोर पंचक, शनिवारचं मृत्यू पंचक आणि रविवारचं रोग पंचक असतं. तर बुधवार आणि गुरुवारचं पंचक अशुभ गणलं जात नाही.
‘अग्नि-चौरभयं रोगो राजपीडा धनक्षतिः।संग्रहे तृण-काष्ठानां कृते वस्वादि-पंचके।।’ या श्लोकानुसार पंचकाचं विश्लेषण करण्यात आलं आहे. या कालावधीत अग्नि, चोरी, सत्ताहानी किंवा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.
पंचक कालावधीत लाकडं एकत्र करणं किंवा खरेदी करू नये. तसेच घरावर छत टाकू नये, अन्यथा घरात अशांतता वास करते. या कालावधी धन नसने अशुभ मानले गेले आहे. या कालावधी अंत्यसंस्कार करणं योग्य नसल्याचं गणलं गेलं आहे. पण काही नियमांचं पालन करून करता येतात. पलंग तयार करू नये किंवा खरेदी करू नये. तसेच दक्षिण दिशेस प्रवास करू नये. कारण ही यमाची दिशा मानली गेली आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)