मुंबई : सनातन धर्मात कोणतेही कार्य करण्यापूर्वी शुभ आणि अशुभ काळाचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात असे पाच दिवस असतात जेव्हा कोणतेही शुभ आणि मंगल कार्य केले जात नाही. हे पाच दिवस पंचक (Panchak in June 2023) म्हणून ओळखले जातात. या महिन्यात 9 जूनपासून पंचक सुरू होणार आहे. शुक्रवारी सुरू होत असल्याने या वेळी पंचकला चोर पंचक म्हटले जाईल. या पंचकात व्यापार किंवा पैशाचे व्यवहार टाळावा. चोर पंचक कधीपासून आहे आणि कोणती कामे करण्यास मनाई आहे ते जाणून घ्या.
ज्योतिषशास्त्रीय गणना आणि सनातन पंचांग नुसार पंचक 5 नक्षत्रांच्या संयोगाने बनते. यामध्ये धनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती नक्षत्र यांचा समावेश होतो. चंद्र एका राशीत सुमारे अडीच दिवस राहतो. अशा स्थितीत चंद्र पाच दिवसांत दोन राशीतून भ्रमण करतो. या पाच दिवसांमध्ये चंद्रही या पाच नक्षत्रांमधून जातो म्हणून या पाच दिवसांना पंचक म्हणतात. पंचक दर 27 दिवसांनी येते.
सनातन पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची षष्टी तिथी म्हणजेच 9 जून 2023 सकाळी 06.02 वाजता सुरू होत आहे, जी आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमी तिथीला म्हणजेच 13 जून 2023 रोजी दुपारी 1.32 वाजता समाप्त होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)