मुंबई, असे मानले जाते की जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्मस्थान यांचा माणसाच्या स्वभावावर मोठा प्रभाव पडतो. वर्षाच्या पहिल्या महिन्यात, जानेवारीमध्ये जन्मलेल्यांमध्ये काही जबरदस्त गुण असतात, ज्याच्या मदतीने ते इतरांच्या हृदयावर राज्य करतात. जानेवारीमध्ये जन्मलेल्या लोकांमध्ये (January Born People) नेतृत्व करण्याची अद्वितीय क्षमता असते. याशिवाय ते झटपट निर्णय घेणारेही आहेत. ते विचार करण्यात जास्त वेळ वाया घालवत नाहीत. जानेवारीत जन्मलेली मुलंही त्यांच्या मित्रांची खूप काळजी घेतात. जानेवारीत जन्मलेल्या मुलांमध्ये कोणते विशेष गुण असतात ते जाणून घेऊया.
जानेवारी महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये नेतृत्व क्षमता प्रचंड असते. काही लोकं असे मानतात की, ते जन्मजात नेते आहेत. त्यांना संघटित होऊन काम करण्याचे महत्त्व चांगल्या प्रकारे माहीत आहे. ते आपली जबाबदारी चोख पार पाडतात. त्यांचे वैशिष्टय़ म्हणजे ते स्वतःचे काम कधीही इतरांवर ढकलत नाहीत.
असे मानले जाते की, जानेवारीमध्ये जन्मलेली मुलं विनोदी स्वभावाची असतात. त्यांची मते इतरांपेक्षा काहीशी वेगळी असतात. जर तुम्ही त्यांच्यासोबत असाल तर तुम्हाला त्यांच्या कंपणीचा कधीही कंटाळा येणार नाही. विचार करण्यात ते आपला जास्त वेळ वाया घालवत नाहीत. हे निर्णयही तातडीने घेतात.
असे म्हणतात की, जानेवारी महिन्यात जन्मलेली मुलं दयाळू असतात. इतरांना दुखवणं त्यांच्या स्वभावात नाही. त्यांना कोणी अडचणीत दिसले तर ते त्यांना मदतही करतात.
वर्षाच्या पहिल्या महिन्यात जन्मलेल्यांचा त्यांच्या मित्रांवर खुप जिव असतो. मित्रांसोबत ते कायम आनंदी असतात. ते स्वतःही त्यांच्या मित्रांवर जिव ओवाळून टाकतात. त्याचा विनोदही खूप चांगला आहे.
जानेवारीत जन्मलेल्या मुलांसोबत राहताना तुम्हाला सुरुवातीला वाटेल की ते हट्टी आहेत, पण तसे नाहीत. ही मुलं उद्धट आणि हट्टी नसतात.