मुंबई : मूळ नक्षत्र हे ज्योतिषशास्त्रातील (Astrology) महत्त्वाचे नक्षत्र आहे. हे नक्षत्र मूलभूत ऊर्जा, पुनरावृत्ती आणि अधिकाराचे सूचक म्हणून पाहिले जाते. मूळ नक्षत्राच्या प्रभावाखाली जन्मलेले लोकं सामान्यतः नैसर्गिकरित्या विचारशील, संवेदनशील, अध्यात्म, अभ्यास आणि त्याग यांच्याकडे झुकलेले असतात. पण त्यांना त्यांच्या मुळाशी संबंधित अदृश्य संकटांनाही सामोरे जावे लागते. मूल नक्षत्र हे ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचे मानले जाते. हा आक्रमक ग्रहांचा केंद्र मानला जातो आणि त्याचा अधिपती ग्रह केतू आहे. मूल नक्षत्रात जन्मलेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात आणि स्वभावात काही वैशिष्ट्ये असतात.
या नक्षत्रात जन्मलेले लोकं अभ्यासात खूप तेजस्वी असतात आणि अनेकदा संशोधन कार्यात यश मिळवतात. त्यामुळे ते वैद्यक, ज्योतिष, मीडिया, व्यवसाय आणि राजकारणात करिअर करण्यात यशस्वी होतात.
मूळ नक्षत्रात जन्मलेल्या लोकांची विचारसरणी प्रगतीशील असते आणि ते नियम आणि तत्त्वांचे पालन करतात. त्यांना नियम तोडणारे आणि असे करणारे लोकं आवडत नाहीत. या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांना व्यवसाय किंवा नोकरीसाठी परदेशात जाण्याची संधी मिळते.
मूळ नक्षत्रात जन्मलेले लोक शांतीप्रिय, दयाळू, मैत्रीपूर्ण आणि भावनिक असतात, त्यांचा स्वभाव गोड असतो आणि ते आत्मविश्वासाने अडचणींचा सामना करतात. ते त्यांच्या मेहनतीतून आणि समर्पणाने मोठी कीर्ती मिळवतात. आदर मूळ नक्षत्रात जन्मलेल्या व्यक्तींना आदराला जास्त प्राधान्य असते. ते पैशापेक्षा आदराला अधिक महत्त्व देतात.
त्यांचा स्वत:वर पूर्ण विश्वास असतो आणि त्यांना कुटुंबाकडून विशेष लाभाची अपेक्षा नसते. त्यांचे वैवाहिक जीवन आनंदी असते, परंतु काहीवेळा पत्नीला समजून घेण्यात ते कमी पडतात. त्यांना पोट आणि हृदयाशी संबंधित समस्या असू शकतात. बरेचदा ते लोक हट्टी असतात, आणि ते स्वतःच्या मर्जीने निर्णय घेतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)