‘या’ दोन राशींच्या लोकांनी कधीच एकमेकांसोबत करू नये लग्न; का ते जाणून घ्या!

| Updated on: Jun 20, 2022 | 7:17 PM

मित्रानो हिंदू धर्मात लग्नाआधी पत्रिका पाहण्याची (kundali match making) प्रथा आहे. जन्म कुंडली (birth kundali) मध्ये ज्योतिषी ग्रह, नक्षत्र इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करतात आणि कुंडली जुळत असेल तर लग्न केले जाते.यामध्ये राशीचे गुणसुद्धा पहिल्या जातात, कारण ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास ही तुमच्या स्वभावातले गुणदोष दाखवत असते. चुकून जर दोन विरुद्ध स्वभावाच्या (People of these two […]

या दोन राशींच्या लोकांनी कधीच एकमेकांसोबत करू नये लग्न; का ते जाणून घ्या!
Follow us on

मित्रानो हिंदू धर्मात लग्नाआधी पत्रिका पाहण्याची (kundali match making) प्रथा आहे. जन्म कुंडली (birth kundali) मध्ये ज्योतिषी ग्रह, नक्षत्र इत्यादी गोष्टी बघून गुणांची मोजणी करतात आणि कुंडली जुळत असेल तर लग्न केले जाते.यामध्ये राशीचे गुणसुद्धा पहिल्या जातात, कारण ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास ही तुमच्या स्वभावातले गुणदोष दाखवत असते. चुकून जर दोन विरुद्ध स्वभावाच्या (People of these two zodiac )राशीच्या व्यक्तींचे लग्न झालं तर भांडणं आणि वैचारिक मतभेद होऊ शकतात. यापासून वाचण्यासाठी लग्न करण्याआधी राशींचे स्वभाव माहिती असणे आवश्यक आहे . चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत ज्यांनी एकमेकांशी लग्न करणे टाळायला हवे. (should never marry each other)

  1. कर्क आणि सिंह रास ज्योतिष शास्त्रानुसार कर्क आणि सिंह यांच्यात काही मेळ नाही. कर्क राशीचे लोक हे त्यांच्या जोडीदाराशी भावनिक रित्या जोडलेले असतात, आणि त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतात, तर सिंह राशीच्या व्यक्‍ती स्वतंत्र विचारांच्या असतात. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना असते. अशा परिस्थितीत ते कर्क राशीच्या व्यक्तींच्या अपेक्षांवर खरे उतरत नाहीत , त्यामुळे दोघांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
  2. कुंभ आणि मकर रास  कुंभ आणि मकर या दोघांनाही नात्याबद्दल चांगली समज आहे परंतु त्यांच्या विपरीत स्वभावामुळे बऱ्याचदा त्यांचे एकमेकांशी पटत नाही. मकर राशीचे लोक खूप भावनिक असतात आणि कुंभ राशीचे लोक मात्र प्रत्येक निर्णय व्यावहारिकपणे घेतात. हा फरक त्यांच्यात संघर्षाचे कारण बनु शकतो.
  3. वृषभ आणि तूळ रास या दोन्हीं राशींचे लोक अतिशय बुद्धिमान आणि मोकळ्या मनाचे असतात. सुरवातीच्या काळात यांच्यात खूप चांगलं पटत परंतु दोघांचाही आग्रही स्वभाव. यामुळे हळूहळू ते दोघे एकमेकांना आपला मुद्दा पटवून देण्यासाठी आग्रह करू लागतात, आणि यामुळे त्यांच्यात अहंकाराची समस्या उद्भवते . मित्रानो एकदा का नात्यांमध्ये अहंकार आला तर ते नात कमकुवत होण्याची शक्‍यता असते.
  4. कर्क आणि धनु रास कर्क व धनु राशीची व्यक्‍ती जास्त काळ एकमेकांसोबत राहू शकत नाही . कारण धनु राशीच्या लोकांना वेळेसोबत आणि वेळेनुसार प्रगती करणं चांगल माहिती असतं. तर कर्क राशीच्या व्यक्तीवर याचा कोणताही परिणाम होत नाही. त्यांना त्यांच्या आवडीनुसार जगायला आवडतं. त्यामुळे या जोडीच्या जीवनात अनेकदा भांडण आणि तणावाची परिस्थिती निर्माण होते.
  5. हे सुद्धा वाचा
  6. मिथुन आणि कन्या रास मिथुन आणि कन्या राशीची स्थिती कुंभ आणि मकर यांच्यासारखीच आहे. कन्या राशीच्या व्यक्‍ती खूप व्यवहारिक असतात. आणि मिथुन राशीच्या व्यक्‍ती खूप भावनिक असतात. त्यामुळे दोघांचीही मते एकमेकांशी जुळत नाहीत. त्यांच्यात मतभेद उद्भवतात. खूप त्रास झाल्यानंतर जर कधी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला तर कन्या रास सहजपणे पुढे जाते. पण मिथुन राशीच्या लोकांना अशा परिस्थितीतून बाहेर पडणे कठीण जाते.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)