मुंबई : मीन ही 12 राशींच्या चक्रातील शेवटची राशी आहे. देवगुरु गुरु हा मीन राशीचा (Pisces Personality) अधिपती ग्रह आहे. या राशीचे लोक संपूर्ण राशीमध्ये सर्वात सरळ आणि साधे असतात. मीनचे प्रतीक म्हणजे माशांची जोडी. या राशीचे लोकं रोमँटिक आणि भावूक असतात. याशिवाय त्यांच्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत. भावनिकदृष्ट्या, या राशीचे लोकं क्षणार्धात उत्तेजित होतात. ते खूप संवेदनशील असतात. बृहस्पतिच्या प्रभावामुळे ते शारीरिकदृष्ट्या खूप बुद्धिमान आणि निरोगी असतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे निर्बंध आवडत नाहीत, ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. बोलण्याच्या बाबतीत ते फटकळ असतात. ते कोणतेही काम खूप विचार करून करतात.
मीन राशीचे लोकं त्यांच्या चिन्ह माशासारखे शांत, अतिशय संवेदनशील आणि दयाळू असतात. त्यांचा स्वभाव अतिशय सहानुभूतीपूर्ण असतो. या कारणास्तव वरेच लोकं त्यांना पसंत करतात. या लोकांना स्वप्नवत जगात राहायला आवडते. कधीकधी काल्पनिक आणि वस्तुस्थितीत फरक करणे कठीण होते.
मीन राशीच्या लोकांना कला, संगीत, लेखन साहित्य खूप आवडते. हे लोकं कलात्मक विचारांनी खूप समृद्ध असतात. ते कोणत्याही वातावरणात स्वतःला खूप लवकर जुळवून घेतात. कोणतीही परिस्थिती सहज समजू शकतात.
या लोकांची उंची सरासरी असते आणि हे लोकं थोडे लठ्ठही असतात. त्यांचे डोळे अतिशय सुंदर आणि आकर्षक असतात.
मीन राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप रहस्यमय असते. त्यांच्याबद्दल अंदाज लावणे फार कठीण आहे. हे लोकं स्वभावाने अतिशय धार्मिक असतात. त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे लोकं खूप बुद्धीवादी असतात.
मीन राशीचे लोकं जिद्दी तसेच स्वतंत्र स्वभावाचे असतात. हे लोकं इतरांवर अवलंबून राहू इच्छित नाहीत. हे लोकं लवकर कंटाळतात आणि विचलित होऊ लागतात. उधार दिलेल्या पैशासाठी ते पाठपुरावा करत नाहीत कारण समोरची व्यक्ती स्वेच्छेने पैसे परत करतील अशी अपेक्षा असते. हे लोकं अविवाहित जीवनापेक्षा वैवाहिक जीवनात अधिक आनंदी असतात. मीन राशीच्या लोकांचा 16व्या वर्षी, 22व्या वर्षी, 28व्या वर्षी किंवा 33व्या वर्षी भाग्योदय होतो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)