हिंदू दिनदर्शिकेनुसार पितृ पक्ष (Pitru Paksha) हा भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत असतो. हिंदू धर्मात पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे. या दरम्यान पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध (Shradha and Pindadan) आणि पिंडदान केले जाते. यामुळे पितरांचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो. पितृ पक्षाच्या काळात लग्न, मुंडन, ग्रहप्रवेश इत्यादी कोणतेही शुभ आणि मंगल कार्य केले जात नाही. अनेकांना असा प्रश्न पडतो की या दिवसांमध्ये जन्मलेल्या बाळाचे (Born) भविष्य काय असेल? त्या मुलाचा स्वभाव कसा असेल? जाणून घेऊया जोतिषशास्त्रात याबद्दल काय माहिती देण्यात आलेली आहे.
ज्योतिषांच्या मते पितृ पक्षामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नसले तरी या काळात जन्मलेली मुले खूप शुभ आणि भाग्यवान असतात. पितृ पक्षात जन्मलेल्या मुलांना पितरांचा आशीर्वाद असतो. असे मानले जाते की, अशी मुले त्यांच्याच कुळातील पूर्वज असतात. ही मुले कुटुंबाच्या उन्नतीसाठी काम करतात. अशी मुले घरातील सदस्यांना नेहमीच महत्त्व देतात.
शास्त्रानुसार पितृ पक्षात जन्मलेली मुले खूप सृजनशील असतात. अशा मुलांचा जन्म एका खास उद्देशासाठी होतो. अशी मुले अतिशय आनंदी स्वभावाची असतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाबद्दल खूप आपुलकी असते.
सकारात्मक विचार करण्यासोबतच ते योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात. ही मुले अगदी लहान वयातच मोठे यश मिळवतात. तथापि, पितृ पक्षात जन्मलेल्या मुलांच्या कुंडलीत चंद्र कमकुवत स्थितीत असतो, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक अडथळे येतात. ज्योतिषीय उपायांनी चंद्र मजबूत केला जाऊ शकतो.