मुंबई : देशाला लवकरच नवे राष्ट्रपती (President of India election) मिळणार आहे. 21 जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. कारण देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे. 18 जुलैला यासाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राष्ट्रपती निवडणुकीशी संबंधित महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. राष्ट्रपती राम नाथ कोविंद (ramnath kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै 2022 रोजी संपत आहे. याआधी देशाच्या पुढील आणि 15व्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. गेल्या 45 वर्षांपासून याच निवडणुक पद्धतीने राष्ट्रपतींची देशाच्या सर्वोच्च पदी निवड होत आहे. 17 जुलै 2017 रोजी अखेरच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या. राष्ट्रपती निवडण्यासाठी सामान्य लोक मतदान करत नाहीत. तर त्यासाठी जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आणि वरच्या सभागृहातील लोकप्रतिनिधी मतदान करतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दोन्ही सभागृहांचे सदस्य लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्य मतदान करतील. नव्याने राष्ट्रपदी होण्यासाठी काही नावंही चर्चेत आहेत.
राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत सध्या पाच नावे चर्तेत असल्याचीही माहिती समोर आले आहे. विशेष म्हणजे या सर्व चारही महिला असल्याने पुढच्या राष्ट्रपती या महिला असण्याचीही दाट शक्यता आहे. यात चर्चेतली चार नवे तर सध्या विविध राज्याच्या राज्यपालपदी विराजमान आहेत, यात कुणाची नावं चर्चेत आहेत? यावरही एक नजर टाकूया…
राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपद हे आजपर्यंत आदिवासी महिलेला मिळालेलं नाही. याचा विचार करता, मुर्मू आणि उईके या दोन आदिवासी महिला आहेत, त्यातील एका महिलेला राष्ट्रपतीपद दिलं जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काही सदस्य देशात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करू शकत नाहीत. त्यामध्ये राज्यपाल नियुक्त सदस्य आणि विधान परिषदेच्या सदस्यांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाही. एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री विधान परिषदेचा सदस्य असेल तर त्यालाही राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करता येत नाही. आजच हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने देशाच्या सर्वोच्च पदासाठी निवडणूक लागली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीच्या हलचालीही वेगाने सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसांतच ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.