मुंबई : ज्योतिषशास्त्रात पुखराज (Pukhraj ratna) हे गुरूचे रत्न मानले जाते. बृहस्पती ग्रहाला बलवान बनवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात पुष्कराज घालण्याचा सल्ला दिला जातो. गुरु हा ग्रह गुरू पिता, मूल, धार्मिक कार्य, सोने आणि दान यांच्याशी संबंधित आहे. जेव्हा गुरूची स्थिती मजबूत असते, तेव्हा जीवनात सर्व प्रकारचे यश मिळते. लोक आदर करतात. समाजात मानाचे स्थान मिळते तसेच भरपूर संपत्ती आणि प्रसिद्धी प्राप्त होते. ज्या लोकांच्या कुंडलीत बृहस्पती कमकुवत स्थितीत आहे ते सोन्याच्या अंगठीत पुष्कराज घालू शकतात. याचा त्यांना नक्कीच फायदा होईल. पुखराज धारण केल्याने व्यक्तीचे ज्ञान वाढते आणि करिअरमध्ये यशाचे नवीन मार्ग खुले होतात. पुष्कराज कधी आणि कसा घालायचा आणि त्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊ या.
पुष्कराज किमान 5 किंवा 7 कॅरेटचा परिधान केला पाहिजे. तो सोन्याच्या अंगठीत घातला पाहिजे. गुरुवारी पुखराज धारण करणे अत्यंत शुभ असते. सकाळी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर पुष्कराज अंगठीला दूध आणि गंगेच्या पाण्याने स्नान घालावे. ही अंगठी उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये धारण करून गुरु बीज मंत्राचा जप करत धारण करावा. याचे लवकरच चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील.
ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे, की सर्व राशीचे लोक प्रत्येक रत्ने धारण करू शकत नाहीत. पुखराजसाठी ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते, की दोन राशीच्या लोकांसाठी जीवनात यश मिळविण्यासाठी हे सर्वोत्तम रत्ने आहे. बृहस्पती हा धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे, त्यामुळे या दोन राशीचे लोक हे रत्न धारण करू शकतात. या दोन्ही राशीचे लोक स्वभावाने खूप मेहनती आणि धाडसी असतात. त्यांच्या आत अद्भुत ऊर्जा असते आणि अशा लोकांना पुष्कराज धारण केल्याने खूप फायदा होतो. ते त्यांची ऊर्जा योग्य ठिकाणी वापरण्यास सक्षम असतात. ते परिधान केल्याने योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते आणि मन शांत होऊन आणि राग नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
याशिवाय तूळ राशीचे लोक पुष्कराजची अंगठी घालू शकतात, कारण गुरु हा या राशीच्या पाचव्या घराचा स्वामी मानला जातो. म्हणूनच हे रत्न त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पुष्कराज घातल्यास हिरा घालू नये. जर कुंडलीत बृहस्पती दुर्बल असेल तर पुष्कराज घालू नये. या राशींशिवाय मेष, कर्क, सिंह आणि वृश्चिक राशीचे लोकही पुष्कराज घालू शकतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)