मुंबई : राशीचक्रात ग्रहांच्या गोचरामुळे बऱ्याच उलथापालथ होत असतात. एखादा ग्रह एका राशीतून पुढच्या राशीत सरकला की घडामोडींना वेग येतो. खासकरून पापग्रहांनी राशी बदल की परिणाम लगेच दिसून येतो. पापग्रहांनी राशी बदल करताच तात्काळ अडचणींना सामोर जावं लागतं. पापग्रहांमध्ये राहु, केतु आणि शनि या ग्रहांचा समावेश आहे. राहु आणि केतु हे राशीचक्रात उलट्या पावलाने गोचर करणारे ग्रह आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही एकाच वेळी आपलं राशी बदल करतात. त्यामुळे राशीचक्रात घडामोडी वेगाने पुढे सरकतात. पापग्रह राहु जुगार, कटु बोलणं, त्वचा रोग, दुष्ट कामं आणि चोरीचा कारक ग्रह आहे. हा ग्रह वैयक्तिक कुंडलीत चुकीच्या ठिकाणी बसल्यास व्यक्तीला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे राहुच्या गोचराकडे ज्योतिष्याचं लक्ष लागून असतं. पापग्रह राहु 2023 या वर्षात गोचर करणार आहे. जवळपास 18 महिने एका राशीत ठाण मांडून बसतो.
30 ऑक्टोबर 2023 रोजी राहु आणि केतु राशी बदल करणार आहेत. राहु ग्रह मेष राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. या राशीला आधीच साडेसाती सुरु आहे. त्यात राहुच्या गोचरामुळे हा काळ त्रासदायक असणार आहे.दुसरीकडे तीन राशींना हा काळ अडचणीचा जाणार आहे. सध्या राहु हा ग्रह मेष राशीत ठाण मांडून बसला आहे. तर केतु हा ग्रह तूळ राशीत विराजमान आहे. हे दोन्ही कायम एकमेकांसमोर असतात. या दोन्ही ग्रहांची कधीही युती होत नाही.
मेष- या राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. म्हणजेच या राशीच्या दुसऱ्या स्थानात राहु असणार आहे. हे स्थान धनाचं घर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे दीड वर्षांचा काळी मेष राशीसाठी अडचणीचा ठरणार आहे. लोकांशी विनाकारण वाद वाढतील.मानसिक तणावामुळे कामात मन लागणार नाही.
वृषभ- या राशीच्या तिसऱ्या स्थानात राहु असणार आहे. त्यामुळे हा काळ अडचणीचा ठरेल. आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागेल. राहु गोचरामुळे विचार क्षमतेवर गंभीर परिणाम दिसून येईल. समाजात मान सन्मान कमी होईल. त्यामुळे या काळात पैसे विचार करूनच खर्च कराल.
मकर- या राशीच्या जातकांना शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. त्यात राहुच्या गोचरामुळे त्रास सहन करावा लागू शकतो. मकर राशीच्या अकराव्या स्थानात राहु असणार आहे. हे स्थान नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित आहे. राहुच्या गोचरामुळे कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही. मेहनत करूनही अपेक्षित यश मिळणार नाही. तसेच तब्येत साथ देणार नाही.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)