मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि, राहु आणि केतु यांना पापग्रहाच्या दर्जा देण्यात आला आहे. हे ग्रह जातकांना जबरदस्त दणका देतात. 17 जून 2023 पासून शनिदेव वक्री अवस्थेत असणार आहे. शनिदेव मूळ त्रिकोण राशी कुंभमध्ये वक्री होत आहेत. शनिसोबत राहु आणि केतुही वक्री अवस्थेत आहे. राहु आणि केतु तसं पाहिलं तर कायम वक्री चाल चालतात. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यात तीन मुख्य ग्रह वक्री अवस्थेत असणार आहे. या तीन ग्रहांच्या स्थिचीचा राशीचक्रावर परिणाम होईल. खासकरून तीन राशीच्या जातकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पुढचे सहा महिने तीन राशीच्या जातकांना कठीण असतील, असं ज्योतिष्याचं म्हणणं आहे. त्यामुळे या काळात सावध राहणं आवश्यक आहे.
सिंह : या राशीच्या जातकांना शनि, राहु आणि केतुच्या वक्री अवस्थेमुळे जबरदस्त फटका बसेल. कामात काही ना काही विघ्न पडताना दिसेल. इतकंच काय तर होणारी कामंही होत नसल्याने अस्वस्थता वाढेल. नशिबाची साथ हवी तशी मिळणार नाही. काही निर्णय तुम्हाला अडचणीत टाकणारे असतील. नोकरी करणाऱ्या जातकांना त्रास सहन करावा लागू शकतो. या काळात वाहन व्यवस्थित चालवा, अपघात घडण्याची शक्यता आहे.
कर्क : शनि, राहु आणि केतुच्या वक्री स्थितीचा फटका या राशीच्या जातकांनाही बसणार आहे. या काळात तणाव सहन करावा लागू शकतो. कायदेशीर प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठं नुकसान होण्याची शक्यता या काळात आहे. आर्थिक हानी या काळात होऊ शकते. काही कामं होता होता राहतील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढतील.
वृश्चिक : या राशीला शनिची वक्री स्थिती आणि राहु-केतुची नजर चांगलीच महागात पडेल असं चित्र आहे. नवी काम सुरु करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकोत. त्यामुळे पुढच्या सहा महिन्यात काम करताना विशेष काळजी घ्या. पार्टनरशिपच्या धंद्यात फटका बसू शकतो. त्यामुळे निर्णय घेताना तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)