मुंबई : ज्योतिषशास्त्रात राहु आणि केतुला पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. हे दोन्ही ग्रह मायावी असून मृगजळापाठी जातकांना धावण्यास भाग पाडतात. त्यामुळे राशीत अशुभ स्थितीत असल्यास जातकांना फटका बसतो. राहु आणि केतु 18 महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. आता 18 महिने पूर्ण होत आले असून 30 ऑक्टोबरला राहु आणि केतु राशी परिवर्तन करणार आहे. यात राहु मेष राशीतून मीन राशीत, तर केतु तूळ राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या गोचराचा राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. खासकरून तीन राशीच्या जातकांना जबरदस्त लाभ होणार आहे. चला जाणून घेऊयात तीन राशी कोणत्या ते..
मेष : या राशीतून राहुचं गोचर होताच चांडाळ योग संपुष्टात येणार आहे. त्यामुळे गुरुचं बळ वाढणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होतील. उद्योग व्यवसायात प्रगती दिसून येईल. त्याचबरोबर आरोग्य विषयक तक्रारीही दूर होतील. नशिबाची उत्तम साथ मिळेल. अचानक बदल झाल्याने कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.
वृषभ : या राशीच्या जातकांना दोन्ही ग्रहांच्या गोचराचा लाभ मिळेल. मुलांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. अभ्यासातील प्रगती पाहून आनंद वाटेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल. विदेशात असलेल्या व्यवसायात प्रगती दिसून येईल. या कालावधीत प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकता. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होईल.
कर्क : या राशीच्या जातकांना लाभ मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. समाजात मानसन्मान वाढेल. परदेशात जाण्याचा योग जुळून येईल. कौटुंबिक पातळीवर भावंडांची उत्तम साथ मिळेल. तुमचे पैसे कुठे अडकले असतील ते परत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या जातकांना काही संधी मिळू शकतात. आहे त्या ठिकाणी नवं पद मिळू शकते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)