Rajyoga: गुरूच्या उदयाने निर्माण होणार राजयोग, या राशीच्या लोकांना होणार मोठा लाभ

| Updated on: Feb 16, 2023 | 3:48 PM

काही विशेष ग्रहांची स्थिती लक्षात ठेवण्यासाठी सोपी व्हावी यासाठी भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये योगांना नाव दिली गेली आहेत. जसे की चंद्र आणि गुरु त्यांच्यातील केंद्र मधे असेल त्याला गजकेशरी राजयोग म्हटले जाते.

Rajyoga: गुरूच्या उदयाने निर्माण होणार राजयोग, या राशीच्या लोकांना होणार मोठा लाभ
ग्रहांचा अस्त
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), प्रत्येक ग्रह विशीष्ट काळानंतर अस्त पावतो. अस्त पावलेल्या ग्रहाचा नंतर उदय होतो. जेव्हा ग्रहाचा अस्त आणि उदय होतो सर्व राशींवर त्याचा प्रभाव पडतो . पंचांगानुसार,  गुरु ग्रह 22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 05.46 वाजता मीन राशीत उदयास येईल. गुरुचा उदय झाल्यावर त्रिकोण राजयोग (Rajyoga) तयार होईल. ज्याचा तिन्ही राशींवर सकारात्मक प्रभाव पडेल. या काळात त्यांना फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊया.

कोणत्या राशींना होणार फायदा

मिथुन

मिथुन राशीला त्रिकोण राजयोगाचा लाभ होईल. या काळात धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. आर्थिक क्षेत्रात मजबूत होईल. बोलण्यात गोडवा राहील. कामात चांगले परिणाम दिसून येतील. आत्मविश्वासात वाढ होईल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांना गुरूच्या उदयाचा सकारात्मक प्रभाव दिसेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. चांगले भाग्य मिळण्याची सर्व शक्यता आहे. व्यवसायासाठी सहलीला जाऊ शकता. परदेशात शिक्षणाच्या नवीन संधी मिळू शकतात.

हे सुद्धा वाचा

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांना त्रिकोण राजयोगाचा लाभ होऊ शकतो. नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात. बढतीची शक्यता निर्माण होत आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल.

राजयोग म्हणजे काय?

काही विशेष ग्रहांची स्थिती लक्षात ठेवण्यासाठी सोपी व्हावी यासाठी भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये योगांना नाव दिली गेली आहेत. जसे की चंद्र आणि गुरु त्यांच्यातील केंद्र मधे असेल त्याला गजकेशरी राजयोग म्हटले जाते. मंगळ, बुध, गुरु, शुक्र किंवा शनी केंद्रात आपली राशी किंवा आपल्या उच्च राशीमध्ये असेल तर, त्याला पंच महापुरुष योगाचे नाव दिले गेले आहे.

जर कुठला केंद्राचा स्वामी कुठल्या त्रिकोणाच्या स्वामी संबंधित बनते तर त्याला राजयोग म्हणतात. केंद्र म्हणजे 4, 7, 10 भाव आणि त्रिकोण म्हणजे 5 आणि 9 भाव. पहिला भाव केंद्र आणि त्रिकोण दोन्ही मानले जाते. जसे की आधी सांगितले दोन ग्रहांच्या मध्ये संबंधाचा अर्थ-

युती म्हणजे एकसोबत बसणे
दृष्टी म्हणजे एकमेकांना पाहणे
परिवर्तन म्हणजे एकमेकांच्या राशीमध्ये बसणे

जसे मेष राशीतील एक त्रिकोण म्हणजे पाचवे आणि नवव्या भावाचे स्वामी आहे सुर्य आणि गुरु. जर यांचा पहिल्या भावातील स्वामी म्हणजे मंगळ, किंवा चौथ्या भावाचा स्वामी म्हणजे चंद्र, किंवा सातव्या भावाचा स्वामी म्हणजे शुक्र किंवा दहाव्या भावाचा स्वामी म्हणजे शनीची युती, दृष्टी किंवा परिवर्तन असेल तर पाराशरी राजयोग बनेल. जितके जास्त संबंध होतील तितके जास्त राजयोग होतील.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)