मुंबई : हिंदू कॅलेंडरनुसार, रक्षाबंधन (Raksha Bandhan 2023) हा सण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या वर्षी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10:58 पासून पौर्णिमा तिथीसह भद्रा सुरू होईल, जी रात्री 09:01 पर्यंत राहील. दुसरीकडे, श्रावण पौर्णिमा 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07:07 वाजता संपेल. 30 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त 31 ऑगस्ट रोजी रात्री 9.01 ते 07.05 पर्यंत आहे. ज्योतिषशास्त्र आणि वास्तूनुसार, प्रत्येक रंग कोणत्या ना कोणत्या ग्रह आणि राशीशी संबंधित आहे, जो त्याच्यासाठी सर्वात शुभ आहे. जर राशीनुसार रंग निवडले असतील तर ते भावासाठी खूप फायदेशीर आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणींनी भावाच्या मनगटावर राशीनुसार रंगांची राखी बांधावी, यामुळे नाते दृढ होते आणि भावाच्या जीवनात समृद्धी येते.
मेष- जर तुमच्या भावाची राशी मेष असेल तर रक्षाबंधनाच्या दिवशी त्याला लाल, पिवळा, हिरवा आणि सोनेरी रंगाची राखी बांधा.
वृषभ- वृषभ राशीच्या लोकांनी पांढरी, सोनेरी पिवळी किंवा आकाशी रंगाची राखी बांधणे शुभ असते.
मिथुन- मिथुन राशीच्या लोकांसाठी हिरवा रंग खूप शुभ मानला जातो, त्यामुळे रक्षाबंधनाला बहिणींनी हिरवी राखी बांधावी. याशिवाय तुम्ही निळ्या आणि सोनेरी रंगाची राखीही बांधू शकता.
कर्क- ज्योतिष शास्त्रानुसार जर तुमच्या भावाची राशी कर्क असेल तर रक्षाबंधनाला तुम्ही त्याला पांढरी किंवा फिकट पिवळी राखी बांधू शकता, यामुळे तुमच्या भावाच्या आयुष्यात सुख-समृद्धी येते.
सिंह- ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या भावांना लाल, केशरी, गुलाबी किंवा सोनेरी रंगाची राखी बांधणे शुभ मानले जाते.
कन्या- जर तुमच्या भावाची राशी कन्या असेल तर तुम्ही त्याला पिस्ता हिरवा, सोनेरी, पिवळा किंवा गुलाबी रंगाची राखी बांधू शकता.
तूळ- तूळ राशीच्या भावांना तुम्ही चमकदार पिवळ्या, पांढर्या आणि निळ्या रंगाची राखी बांधू शकता.
वृश्चिक- या राशीच्या भावासाठी बहिणीने लाल, हिरवा, पिवळा रंगाची राखी बांधली तर ती खूप शुभ मानली जाते.
धनु- रक्षाबंधनाच्या दिवशी या राशीच्या भावांना पिवळ्या, भगव्या आणि सोनेरी रंगाची राखी बांधणे अत्यंत शुभ मानले जाते.
मकर- मकर राशीचे भाऊ रक्षाबंधनाला निळ्या किंवा मिश्र रंगाची राखी बांधू शकतात.
कुंभ- कुंभ राशीच्या लोकांसाठी निळा, काळा किंवा गडद रंग शुभ असतो, त्यामुळे रक्षाबंधनाला या रंगांची राखी बांधा.
मीन- या राशीच्या लोकांना सोनेरी आणि पिवळी राखी बांधणे खूप शुभ राहील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)