ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Horoscope Today 2 April 2024) हे ग्रह-नक्षत्रांच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.
मेष
नोकरीच्या ठिकाणी नवीन संधी मिळतील. जोडीदाराकडून तुम्हाला प्रेम आणि आदर मिळेल. घाईघाईत कोणताही निर्णय घेणे टाळा. काही भावनिक आव्हानांचा सामना करावा लागेल. तुम्ही तुमच्या भावा-बहिणींना साथ द्याल. आज नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. मीडिया कम्युनिकेशनच्या क्षेत्राशी संबंधित लोकांना चांगल्या संधी मिळतील. एखाद्या सुंदर ठिकाणी सहलीला जाऊ शकता. प्रवासादरम्यान तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल.
वृषभ
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. तुम्हाला जीवनात महत्त्वाचे बदल दिसतील. विद्यार्थ्यांची सर्जनशील कार्याची आवड वाढेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. लांबच्या प्रवासाची शक्यता आहे. ज्यामुळे तुमच्या व्यवसायात फायदा होईल. आर्थिक बळ मिळेल. कौटुंबिक जीवनातील समस्या दूर होतील. तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही काही नवीन योजनांवर काम कराल, ज्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल.
मिथुन
तुमच्यासाठी सकारात्मक बदलाचा दिवस आहे. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एखादा चांगला प्रकल्प मिळू शकतो. ज्यामध्ये तुम्ही तुमची पूर्ण प्रतिभा दाखवाल. याचा तुम्हाला फायदा होईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागू शकते. विविध स्रोतांमधून उत्पन्न वाढेल. विशेष कामावर खर्चही होऊ शकतो. घराचे नूतनीकरण करण्याचा विचार करू शकता. तुम्हाला एखाद्या कार्यक्रमात जाण्याची संधी मिळेल. तिथे तुम्ही इतर नातेवाईकांना भेटू शकता.
कर्क
आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर राहील. तुम्हाला काही मोठे फायदे मिळू शकतात. अध्यात्मिक कार्याचा आनंद घ्याल. न्यायालयीन खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक काही समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद राहील. कुटुंबासोबत छोट्या सहलीला जाऊ शकता. कार्यक्षेत्रातील कोणत्याही आव्हानांमुळे मागे हटणार नाही.
सिंह
तुमच्यासाठी यशदायी दिवस आहे. सर्व कामे होतील. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. ज्यामध्ये तुम्हाला तुमची क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. आज काही कामांमध्ये घाई होऊ शकते. आज सकारात्मक विचार करत राहा. तुमच्या वैवाहिक नात्यात चांगले संबंध निर्माण होतील. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसाय करण्यासाठी दिवस चांगला आहे, संपूर्ण टीममध्ये उत्साह दिसून येईल. चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. बिझनेस संबंधी काही प्रवास होऊ शकतो.
कन्या
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. नोकरीत तुम्हाला तुमच्या बॉसचे सहकार्य मिळेल. त्यामुळे तुम्हाला खूप फायदा होण्याची शक्यता आहे. भागीदारी व्यवसायात चांगला समन्वय राहील. एखाद्या व्यक्तीद्वारे तुम्हाला पैसे मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या आणि आपल्या खाण्याच्या सवयी सुधारा. तुमच्या व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे.
तूळ
आज तुमची एखाद्या अनुभवी व्यक्तीशी भेट होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तुमच्या व्यवसायात नफा होईल. कौटुंबिक कार्यक्रमात पैसे खर्च होऊ शकतात. असे केल्याने तुमचे कौटुंबिक नाते आणखी घट्ट होईल. जोडीदारासोबतचे संबंध मधुर होतील. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल.इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअरशी संबंधित लोकांसाठी लाभाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहील.
वृश्चिक
आजचा दिवस फायदेशीर ठरेल. कौटुंबिक सुख-शांती राहील. आज कार्यक्षेत्रात जास्त काम मिळू शकते. तुम्हाला सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. खाजगी क्षेत्रात काम केल्याने आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. आज अतिउत्साही होणे टाळा. सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थी परदेशी भाषा शिकण्यासाठी कोर्स करू शकतात. वेळेचा सदुपयोग करा.
धनु
आज कामाच्या ठिकाणी ताण राहील. कामे वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. स्वतःचा व्यवसाय केल्याने विरोधकांना सामोरे जावे लागू शकते. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळेल. खर्च अचानक वाढू शकतो. काही मालमत्तेबाबत वाद होऊ शकतो. शांततेने आणि सभ्यतेने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
मकर
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये समन्वय ठेवा. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. कुठेतरी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. विद्यार्थ्यांची खेळात रुची वाढेल. तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला कुटुंब आणि जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित तपासणी करत रहा.
कुंभ
सहकाऱ्यांशी तुमचा समन्वय चांगला राहील. जोडीदारासोबत तुम्ही आनंदात वेळ घालवाल. कौटुंबिक खर्चात वाढ होईल. धार्मिक कार्यात तुम्हाला रस राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत धार्मिक सहलीलाही जाऊ शकता. व्यापारी वर्गाला विरोधकांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या योजना इतरांसोबत शेअर करू नका. संशोधन करणाऱ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. जेवण वेळेवर करा. नियमित योगा आणि व्यायामाची सवय लावा.
मीन
आजचा दिवस तुमचा भाग्यशाली असेल. काही कारणास्तव परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. तुमचे मन अध्यात्मात गुंतलेले असेल. कार्यक्षेत्रात काही आव्हाने येऊ शकतात. तुम्ही तुमच्या बुद्धीने पुढे जाल, तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन योजना कराल, तुमच्या योजना यशस्वी होतील. कोणाशीही बोलताना तुम्ही तुमच्या भाषेवर नियंत्रण ठेवा. आज कोणत्याही विषयावर चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न कराल. उत्तम आरोग्यासाठी आहाराकडे लक्ष द्या. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)