Rawivar Upay: रविवारच्या दिवशी केलेल्या या उपायांमुळे होते अनेक समस्यांचे निराकरण, सूर्यदेवाच्या कृपेने चमकते भाग्य

| Updated on: Dec 10, 2022 | 10:13 PM

जीवनात सुखसमृद्धी पाहिजे असल्यास जोतिषशास्त्रात रविवारच्या दिवशी काही उपाय सुचविण्यात आलेले आहेत.

Rawivar Upay:  रविवारच्या दिवशी केलेल्या या उपायांमुळे होते अनेक समस्यांचे निराकरण, सूर्यदेवाच्या कृपेने चमकते भाग्य
रविवार उपाय
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  हिंदू धर्मात आणि जोतिषशास्त्रात सूर्यदेवाला (Suryadev) विशेष महत्त्व आहे. ग्रहांचा राजा असेलेल्या सूर्याचा  ज्या व्यक्तीच्या कुंडलीवर शुभ प्रभाव असतो, त्या व्यक्तीचे आयुष्यात सूर्याप्रमाणे तेजस्वी होते, यश आणि कीर्ती प्राप्त होण्याची शक्यता असते. सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय रविवारी करणे उत्तम मानले जाते. रविवार हा सूर्य देवाला समर्पित आहे. तुम्हालाही तुमच्या आयुष्यात धन आणि प्रसिद्धी मिळवायची असेल तर रविवारच्या (Rawiwar Upay) दिवशी हे सोपे उपाय करा.

  1.  जर तुम्हाला भगवान सूर्यनारायणाची कृपा मिळवायची असेल तर रविवारी सकाळी स्नान करून उगवत्या सूर्याला जल अर्पण करा. लक्षात ठेवा की पाणी नेहमी तांब्याच्या कलशात अर्पण करावे. या पाण्यात लाल फुले, रोळी, अक्षत आणि साखर मिसळून अर्पण केल्यास लाभ होतो.
  2.  रविवारी झाडू खरेदी करणे शुभ असते. या दिवशी 3 झाडू खरेदी करा आणि घरी आणा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी हे तीन झाडू तुमच्या जवळच्या मंदिरात दान करा. या उपायाने तुमचे भाग्य उजळेल.
  3.  तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी रविवारी वटवृक्षाचे तुटलेले पान आणा आणि या पानावर तुमची इच्छा लिहा आणि वाहत्या पाण्यात सोडून द्या. लवकरच तुमची इच्छा पूर्ण होईल.
  4.  जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि प्रसिद्धी मिळवायची असेल तर रविवारी पिंपळाच्या झाडाखाली पिठाचा चारमुखी दिवा लावा. या उपायाने तुम्हाला फायदा होईल.
  5.  

    जर तुम्हाला ऐश्वर्य आणि समृद्धी पाहिजे असेल तर रविवारी रात्री झोपताना उशीजवळ  दुधाचा ग्लास भरून ठेवावा. सकाळी उठल्यानंतर बाभळीच्या झाडाच्या मुळाशी सोडावे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)