या रत्नाला मानले जाते रत्नांचा राजा, धारण केल्याने मिळतात चमत्कारिक फायदे

| Updated on: Sep 26, 2023 | 11:46 AM

जीवनात समृद्धी, स्थिरता आणि प्रगतीसाठी माणिक धारण केले जाते. हे रत्न धारण केल्याने ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो व नोकरी आणि व्यवसायात चांगले यश प्राप्त होते. माणिकला रत्नांचा राजा म्हटले जाते.

या रत्नाला मानले जाते रत्नांचा राजा, धारण केल्याने मिळतात चमत्कारिक फायदे
रूबी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रात,  84 रत्न असल्याचे नमूद केले आहे, त्यापैकी एक माणिक (Ruby Stone Benefits)  आहे. माणिकचा संबंध ग्रहांचा राजा सूर्य देवाशी आहे. ज्यांच्या पत्रिकेत सूर्याची स्थिती कमकुवत असते, त्यांच्या पत्रिकेत बाकीचे ग्रह बलवान असूनही शुभ परिणाम देऊ शकत नाहीत. म्हणून, सूर्याची स्थिती मजबूत करण्यासाठी माणिक घालण्याचा सल्ला दिला जातो. संस्कृतमध्ये माणिकला पद्मराग आणि रविरत्न म्हणतात, तर इंग्रजीत रुबी स्टोन म्हणतात. व्यस्त जीवनात समृद्धी, स्थिरता आणि प्रगतीसाठी माणिक धारण केले जाते. हे रत्न धारण केल्याने ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो व नोकरी आणि व्यवसायात चांगले यश प्राप्त होते. माणिकला रत्नांचा राजा म्हटले जाते. त्याचे सौंदर्यात्मक मूल्य तसेच भौतिक आणि आध्यात्मिक गुणधर्मांमुळे ते एक अत्यंत मौल्यवान रत्न बनते.

ज्योतिषांच्या मते बोटावर माणिक रत्न धारण केल्याने अनेक फायदे होतात. तथापि, प्रत्येकाने माणिक रत्न धारण करू नये. चांगल्या ज्योतिषाचा सल्ला घेऊनच ते घालावे. माणिक रत्नाचा लाल रंग मेष राशीच्या लोकांच्या ज्वलंत स्वभावाशी पूर्णपणे जुळतो. मेष राशीचे लोकं सहसा धैर्यवान आणि निर्भय असतात. रुबी रत्न त्यांचा मजबूत स्वभाव टिकवून ठेवण्यास मदत करतात. हे त्यांना कधीकधी त्यांच्या मनात असलेल्या शंका किंवा भीतीवर मात करण्यास मदत करते. आणि अशा प्रकारे शेवटी हे रत्न त्यांना त्यांच्या कार्यात यश आणि समाजात प्रसिद्धी मिळविण्यात मदत करते. चला तर मग जाणून घेऊया माणिक रत्न धारण करण्याचे काय फायदे आहेत.

माणिक रत्नाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत

  • माणिक रत्न आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढवते. हे परिधान करणार्‍यांना नेतृत्व शक्ती प्रदान करते.
  • हे तुम्हाला अधिकृत पदापर्यंत पोहोचण्यास किंवा शक्य तितक्या चांगल्या प्रकारे व्यवस्थापन हाताळण्यास मदत करते.
  • रुबी रत्न परिधान करणार्‍यांची गतिशील शक्ती वाढवते, जसे की सर्जनशील कौशल्ये, बौद्धिक कौशल्ये आणि संवाद कौशल्य.
  • हे रत्न धारण केल्याने आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होते.
  • माणिक रत्न सूर्य देवाशी संबंधित मानले जाते. हे धारण केल्याने व्यक्तीचा सूर्य ग्रह बलवान होतो.
  • माणिक रत्नाची अंगठी धारण केल्याने व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते.

या राशीच्या लोकांनी माणिक रत्न घालू नये

ज्योतिषांच्या मते मिथुन, कन्या, तुला, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी माणिक रत्न घालू नये. याशिवाय जे लोक लोखंड, तेल किंवा कोळशाशी संबंधित काम करतात त्यांनी देखील हे रत्न घालणे टाळावे. या लोकांना माणिक रत्न धारण केल्याने अशुभ परिणाम मिळू शकतात.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)