मुंबई, न्यायाची देवता शनिदेवांनी काल तब्बल 30 वर्षांनंतर आपल्या लाडक्या घरात प्रवेश केला. काही राशींवर या संक्रमणाचा विपरीत परिणाम होईल तर काही राशींवर सकारात्मक परिणाम होईल. साडेसाती (Sadesati 2023) हा संघर्षाचा काळ आहे. साडेसातीच्या काळात अनेकांवर कठीण प्रसंग येत असतात, असे असले तरी याच कालावधीत आपलं कोण आणि परकं कोण, याची नव्याने ओळख होते. साडेसातीच्या काळात आपले अनेक निर्णय चुकतात, योजना फसतात, अनेकदा जीवनही नकोसे वाटायला लागते. मात्र, स्वतःवर विश्वास आणि चिकाटी असलेली माणसं यातून तावून-सुलाखून बाहेर पडतात. ज्याच्यामुळे साडेसाती येते, तो शनी ग्रह असला, तरी ज्योतिषशास्त्र आणि नवग्रहांमध्ये त्याला देवाचे स्थान देण्यात आले आहे.
शनी हा सूर्यपुत्र मानला जातो. शनी हा नवग्रहांमधील न्यायाधीश ग्रह आहे. तितकाच ते कर्मप्रदाता आहे. शनी वाईट काहीच करत नाही. उलट, आपण आपल्या पूर्वायुष्यात केलेल्या कर्माची फळे देतो. जाणून घेउया कोणकोणत्या राशी यामधुन कोणकोणत्या राशींना सुटका मिळाली आहे. जाणून घेऊया.
धनु राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचे संक्रमण खूप फायदेशीर ठरेल. धनु राशीच्या लोकांवर शनिदेवाचे संक्रमण होताच
साडेसात वर्षापासून स्वातंत्र्य मिळेल. शनिदेव तुमच्या कुंडलीच्या तिसर्या भावात प्रवेश करतील जे धनाच्या घरात आहे.
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचे संक्रमण खूप फायदेशीर ठरेल. मिथुन राशी बदल अनुकूल राहील. कारण शनि गोचर होताच मिथुन या राशीच्या लोकांना अडिचकीपासून मुक्ती मिळेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण खूप फायदेशीर ठरेल. कारण ही राशी शनिदेवाची आवडती राशी आहे आणि ती त्यांचे घरही आहे.शनिदेव साडेसातचा पहिला टप्पा पूर्ण करून दुसरा टप्पा सुरू होईल. अशा स्थितीत कुंभ राशीच्या लोकांना आदर मिळेल.
मकर राशीसाठी शनिदेव शुभ ठरतील. कारण मकर राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. या राशीच्या लोकांना येणारा काळ हा अतीशय सुखाचा असेल. येणाऱ्या काळात उत्पन्नाचे नविन स्रोत निर्माण होतील.