मुंबई : आज अधिक मासातील संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi Augast 2023) आहे. सनातन धर्मात श्रीगणेशाची आद्य देवता म्हणून पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार श्रीगणेशाची आराधना केल्याने सर्व दुःख आणि विघ्न दूर होतात. तसेच भक्तांना सुख-समृद्धी प्राप्त होते. श्रीगणेशाचा महिमा ज्योतिषशास्त्रात सविस्तरपणे सांगितला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार श्रीगणेशाची पूजा केल्याने अनेक प्रकारचे ग्रह दोष दूर होतात. यासोबतच असे देखील सांगण्यात आले आहे की भगवान श्री गणेशाला तीन राशी सर्वात प्रिय आहेत आणि त्यांच्यावर गणपतीची कृपा राहते. चला जाणून घेऊया, गणेशाच्या प्रिय राशींबद्दल.
श्री गणेशाच्या आवडत्या राशींमध्ये मेष राशीचे नाव पहिले आहे. त्यांच्यावर सदैव गणपतीची कृपा राहो. गणेशाच्या कृपेने जातकांना यशस्वी आणि बुद्धिमान म्हणून समाजात मान असतो. यासोबतच आयुष्यात कठीण प्रसंग आला तरी काळाबरोबर अडथळे दूर होतात. मेष राशीच्या लोकांनी गणेश वंदनाचा पाठ करावा आणि पूजेत 21 दुर्वांच्या जोड अर्पण कराव्यात.
श्रीगणेशाच्या आवडत्या राशींमध्ये मिथुनचे नाव देखील घेतले जाते. गणपतीच्या आशीर्वादाने या राशींना कार्य आणि शैक्षणिक क्षेत्रात यश मिळते. यासोबतच त्यांचे व्यक्तिमत्त्वही खूप प्रभावशाली असते, जे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही सकारात्मक परिणाम करते. मिथुन राशीच्या लोकांनी दर बुधवारी गणेशाची पूजा करावी आणि बेसनाचे लाडू अर्पण करावेत.
मकर राशीचे लोकं देखील भगवान श्री गणेशाच्या आवडत्या राशीमध्ये येतात. या राशीचे लोकं मेहनती असतात आणि आपले काम प्रामाणिक व समर्पणाने पूर्ण करतात. कठिण परिस्थितीत ते हार मानत नाही. या कारणांमुळे या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी यश मिळते. मकर राशीच्या लोकांनी बुधवार आणि चतुर्थीला गणेश मंदिरात जाऊन गणेश चालिसाचे पठण करावे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)