Shani 2023: कुंभ राशीत शनिदेव जागृत अवस्थेत आल्याने चार राशींना मिळणार साथ, जाणून घ्या नेमकं काय ते

| Updated on: Aug 21, 2023 | 7:22 PM

Shani Situation 2023 : ज्योतिषशास्त्रात इतर ग्रहांचा अभ्यास करण्यापूर्वी शनिची स्थिती पाहिली जाते. हा ग्रह कोणत्या स्थितीत कोठे वसला आणि कशा स्थितीत आहे यावरून भाकीत केलं जातं. सध्या शनिदेव कुंभ राशीत आहे.

Shani 2023: कुंभ राशीत शनिदेव जागृत अवस्थेत आल्याने चार राशींना मिळणार साथ, जाणून घ्या नेमकं काय ते
शनिदेव
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा सर्वात मंद गतीने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीत अडीच वर्षे ठाण मांडून बसल्यानंतर ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यामुळे एखाद्या राशीवर दीर्घकाल प्रभाव टाकणारा हा ग्रह आहे. यामुळे शनिदेव राशीला आला की चांगल्या चांगल्या जातकांची स्थिती डळमळून जाते. सध्या शनिदेव स्वरास असलेल्या कुंभ राशीत आहेत. मात्र त्यांची स्थिती मजबूत नव्हती. ग्रहाच्या डिग्रीवरून त्याचा अंदाज बाधला जातो. शनिदेव 15 ऑगस्टपासून जागृत अवस्थेत आले आहे. कारण कोणताही ग्रह जेव्हा 1 ते 10 डिग्रित असेल आणि विषम राशीत असला तरी त्या स्थितीला जागृत अवस्था संबोधलं जातं. या स्थितीचा राशीचक्रावर परिणाम दिसून येईल. पण चार राशीच्या जातकांना अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. चला जाणून घेऊयात या राशींबाबत

चार राशीच्या जातकांना शनिची साथ मिळणार

मेष : शनिची जागृत अवस्था या राशीच्या जातकांना शुभ ठरणार आहे. कारण शनिदेव या राशीच्या कर्मस्थानाचे स्वामी असून लाभ स्थानात विराजमान आहेत. त्यामुळे याचे चांगले परिणाम दिसून येतील. या वेळी काही इच्छा पूर्ण होतील. नोकरीच्या पदोन्नती मिळू शकते. तसेच मनासारखा जॉब चालून येऊ शकतो. भुतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. काही भौतिक इच्छा या काळात पूर्ण होतील.

वृषभ : या राशीचं स्वामित्व शुक्र ग्रहाकडे आहे. शनि आणि शुक्रामध्ये मित्रत्वाचं नातं आहे. शनिदेव या राशीच्या गोचर कुंडलीत शश आणि केंद्र त्रिकोण राजयोग तयार करत आहेत. त्यामुळे त्याचा निश्चितच फायदा या राशीच्या जातकांना होणार आहे. काही जण तुमच्या मदतीला धावून येतील. अनपेक्षितपणे तुम्हाला मदतीचा हात मिळाल्याने कामं सोपी होतील. तसेच किचकट कामंही मार्गी लागतील. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं हळूहळू पूर्णत्वास येतील.

मिथुन : या राशीचं स्वामित्व बुध ग्रहाकडे आहे. बुध आणि शनिमध्येही मित्रत्वाचं नातं आहे. त्यामुळे शनिची स्थिती या राशीच्या जातकांना फलदायी ठरणार आहे. शनिची जागृत अवस्था उत्तम साथ देईल. या काळात नशिब जोरावर असणार आहे. काही इच्छा झटपट पूर्ण होतील. काही कामानिमित्त बाहेर जाण्याचा योग जुळून येईल. तसेच परदेशात शिक्षणाची इच्छा असणाऱ्या जातकांची इच्छा पूर्ण होईल.

तूळ : या राशीच्या गोचर कुंडलीत केंद्र त्रिकोण योग तयार होत आहे. तसेच या राशीच्या पंचम स्थानात शनि विराजमान आहे. त्यामुळे या कालावधीत प्रॉपर्टी आणि गाडी खरेदीचा योग जुळून येईल.मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत लोकांना लाभ मिळेल. तसेच समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. या कालावधीत वाणीवर नियंत्रण ठेवा आणि आपल्यामुळे कोण दुखावणार नाही याची काळजी घ्या.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)