मुंबई – ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं महत्त्व वारंवार अधोरेखित केलं गेलं आहे. नवग्रहांमध्ये सर्वात मंदगतीने गोचर करणारा ग्रह म्हणून शनिची गणना केली जाते. पण असं असलं तरी शनि ग्रहाची दृष्टीही तितकीच महत्त्वाची असते. शनिदेवत तृतीय, सप्तम आणि दशम दृष्टीने बघतात. यात तृतीय दृष्टी सर्वात अशुभ मानली जाते.सध्या शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करत आहेत. तर आपली दशम दृष्टी वृश्चिक राशीवर टाकत आहेत. दुसरीकडे शुक्रपण वृश्चिक राशीवर सातवी दृष्टी टाकून आहेत. यामुळे शश आणि मालव्य राजयोग तयार झाला आहे. यामुळे तीन राशींना लाभ होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाकडे एक दृष्टी असते. त्याला सातवी दृष्टी असं संबोधलं जातं. मात्र मंगळ, गुरु आणि शनिकडे तिसरी, सातवी आणि दहावी दृष्टी आहे. शनिची दृष्टी आपल्या राशीत किंवा उच्च राशीत असेल तर लाभदायी ठरते, जेव्हा शनिची दृष्टी मेष, कर्क किंवा सिंह राशीत असते तेव्हा लाभदायी ठरते. शनि ग्रहे जेव्हा गुरु ग्रहावर दृष्टी टाकतात तेव्हा चांगली फळं मिळतात. त्याचबरोबर शनि कुंभ राशीत असतात तेव्हा त्यांची लाभदायी ठरते.
वृषभ – शनिदेवांची दशम दृष्टी या राशीसाठी फलदायी ठरणार आहे. कारण 6 एप्रिल रोजी शुक्राने या राशीत गोचर केला आहे. त्यामुळे शुक्राची सप्तम दृष्टी दांपत्य जीवनावर पडणार आहे. शनिदेव या राशीच्या कर्मभावात भ्रमण करत आहेत. त्यामुळे सप्त भावात दृष्टी टाकत आहे. यासाठी वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. पार्टनरशिपच्या धंद्यात तुम्हाला यश मिळेल. शनिमुळे नवपंचम योगही तयार होत आहे. त्यामुळे व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.
कुंभ – या राशीत शनिदेव ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे दशम दृष्टी जातकांसाठी फलदायी ठरेल. शनिदेवांनी गोचर कुंडलीत शश, केंद्र त्रिकोण राजयोग तयार केला आहे. शुक्र गोचरामुळे मालव्य राजयोग तयार झाला आहे. शनि आणि शुक्राची दृष्टी करियर आणि व्यवसाय भावावर पडत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अपेक्षित यश मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांना या काळात चांगली ऑफर मिळेल. नोकरीत पदोन्नती आणि इंक्रीमेंट मिळू शकते.
सिंह – या राशीच्या जातकांना शनी देवांची दशम दृष्टी आनंददायी ठरेल. शनिदेवांची दशम दृष्टी या राशीच्या चौथ्या स्थानावर पडत आहे. यामुळे व्यापार, रियल इस्टेट, पेट्रोलियम आणि खनिजाशी निगडीत व्यवसायात फायदा होईल. कारण गोचर कुंडलीच्या करियर स्थानात शुक्र ग्रह मालव्य राजयोग तयार करत आहे. त्यामुळ फिल्म लाईन, कलाक्षेत्रीशी निगडीत लोकांना फायदा होईल.