शनी देवाची आठवण काढताच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात शनीचे गोचर (Shani Gochar 2022) म्हंटले तर विचारायलाच नको. शनिदेव आपल्या राशीाल नको अशी जवळपास प्रत्येकाची भावना असते. शनिदेवांना नवग्रहांमध्ये न्यायदेवता म्हणून ओळखले जातात. शनिदेवांचा गोचर हा मंदगतीने होतो. शनिदेव अडीत वर्षानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे ज्या राशीत प्रवेश केला आहे. त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीला साडेसाती सुरु असते. गोचरादरम्यान शनिदेव वक्रीही होतात. वक्री झाल्यानंतर काही कालावधीसाठी मागच्या राशीत जातात. त्यामुळे साडेसाती (Sadesati) आणि अडीचकीची गणितं बदलतात.
शनिदेव सध्या कुंभ राशीत असून वक्री अवस्थेत आहेत. 12 जुलै रोजी, शनि ग्रह त्यांच्या स्वतःच्या राशीत मकर राशीत प्रवेश करणार आहेत. शनिदेव सहा महिने मकर राशीत राहतील. मकर राशीतील वक्री शनिचे संक्रमण काही लोकांसाठी वरदान ठरेल. मकर राशीत शनिच्या वास्तव्यादरम्यान त्यांना खूप फायदा होईल. करिअर-आर्थिक प्रगतीचा वेग प्रचंड वाढेल. जाणून घेऊया कोणत्या तीन राशींसाठी शनिचे गोचर चांगले दिवस घेऊन येणार आहे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)