मुंबई : शनिदेवाला पुराण आणि धर्मग्रंथांमध्ये न्यायाची देवता म्हटले आहे. धार्मिक ग्रंथानुसार सूर्यदेव हे त्यांचे वडील आणि छाया ही त्यांची आई आहे. दरवर्षी त्यांची जयंती वैशाख महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. यावेळी ही शनी जयंती 19 मे रोजी येत आहे. असे म्हणतात की शनि जयंतीला (Shani Jayanti 2023) शनिदेवाची पूजा विधीपूर्वक केल्याने सर्व समस्या दूर होतात आणि शनिदेवाच्या अडिचकीपासून मुक्ती मिळते. जर तुम्हालाही तुमच्या कुंडलीमध्ये शनिदोष किंवा शनि प्रकोपाचा त्रास होत असेल तर आज आम्ही तुम्हाला यापासून बचाव करण्याचे अनेक उपाय सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे जीवन सुखी बनवू शकता.
ज्योतिषांच्या मते मकर, मीन आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची साडेसाती सुरू आहे. त्याच्या परिणामामुळे त्यांचे कोणतेही काम यशस्वी होत नसल्याने त्यांना सर्वत्र नुकसान सहन करावे लागत आहे. त्यांच्या घरातही आजारांनी तळ ठोकला आहे. या संकटातून सुटका मिळवण्यासाठी या तीन राशीच्या लोकांनी नियमितपणे हनुमान चालीसा आणि बजरंग बाण पठण करावे. यासोबतच शिव मंदिरात पूजा आणि दान करावे.
धार्मिक विद्वानांच्या म्हणण्यानुसार ज्या लोकांना शनीची अडिचकी किंवा साडेसातीचा त्रास होत असेल त्यांनी शनि जयंतीच्या दिवशी त्यांना धतुर्याचे बीज अर्पण करावे. भगवान शिव हे देखील शनिदेवाचे दैवत आहेत. म्हणूनच भोलेनाथाची पूजा केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात आणि आपला आशीर्वाद देतात. या उपायाने व्यक्तीचे अडकलेले काम पूर्ण होऊ लागते आणि घरातील सर्व संकटे दूर होतात.
ज्या लोकांना साडेसाती किंवा अडिचकीचा त्रास होत असेल त्यांनी शनि जयंतीच्या दिवशी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करावी. मात्र, या काळात त्यांनी शनिदेवाशी नदर मिळवू नये याची विशेष काळजी घ्यावी. असे केल्याने शनिदेवाची वक्रदृष्टी त्यांच्यावर पडते आणि घरात संकटांचा काळ सुरू होतो. त्याऐवजी, ते त्याच्या चरणांकडे पाहू शकतात. या वेळी तेलाच्या पात्रात त्यांची सावली पाहून छायादान करावे.
अशा लोकांनी ज्यांना शनीची साडेसाती आहे त्यांनी मांसाहार आणि मद्यपानापासून दूर राहावे. असे न केल्यास शनिदेवाचा कोप होतो आणि त्याच्या प्रभावामुळे राशीचे जीवन संकटांनी ग्रासले जाते. अशा लोकांना शनि जयंतीला काळे कुत्रे, कावळा किंवा काळ्या गाईला अन्नदान करावे. असे केल्याने शनिदेवाचा राग शांत होतो आणि ते प्रसन्न होऊन जातकांना आशीर्वाद देतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)