मुंबई : ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे शनिदेव एकदा राशीला आले की चांगल्या चांगल्यांना घाम फुटल्याशिवाय राहात नाही. शनिची दृष्टी, अडीचकी, महादशा, साडेसाती अशा प्रकारातून जातकांना जावं लागतं. पण असं असलं तरी ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय देखील सांगण्यात आले आहेत. त्यासाठी शनि जयंतीचा दिवस खास ठरणार आहे. शनिजयंती वैशाख अमावस्येला साजरी केली जाते.
शनि जयंती 19 मे 2023 रोजी आहे. या दिवशी शनिदेवांची मनोभावे पूजा विधी केल्यास त्याचं चांगलं फळ मिळतं. इतकंच काय तर शनिच्या प्रभावातही दिलासा मिळतो. त्यामुळे शनि जयंतीचा नेमका मुहूर्त कोणता आणि काय उपाय करावे ते जाणून घेऊयात.
वैशाख अमावस्या तिथी 18 मे 2023 रोजी रात्री 9 वाजून 44 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 मे 2023 रोजी रात्री 9 वाजून 24 मिनिटांपर्यंत राहील. 19 मे रोजी शुभ मुहूर्त सकाळी 7 वाजून 11 मिनिटांपासून सकाळी 10 वाजून 35 मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपासून दुपारी 2 वाजेपर्यंत राहील. तसेच संध्याकाळी 5 वाजून 25 मिनिटांपासून 7 वाजून 7 मिनिटांपर्यंत राहील. शुभ मुहूर्तात पूजन केल्यास चांगली फळं मिळतात.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती उपलब्ध स्रोतावर आधारित आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. )