Marathi News Rashi bhavishya Shani Margi 2022 By the grace of Lord Shani Mahapurush Raja Yoga is becoming the fate of these three zodiac signs will shine
. शनी सध्या स्वतःच्या राशीत मकर राशीत पूर्वगामी म्हणजेच भ्रमण करीत आहे, आणि 23 ऑक्टोबरपासून त्याचे संक्रमण होणार आहे. शनीच्या चालीतील बदलामुळे 3 राशींमध्ये पंच महापुरुष राज योग तयार होईल, जो अत्यंत शुभ मानला जातो.
शनिदेव
Image Credit source: Social Media
Follow us on
Shani Margi 2022:शनिदेवाला ज्योतिषशास्त्रात (Astrology) खूप महत्वाचे स्थान देण्यात आलेले आहे, कारण ते न्यायाचे देवता आहेत. शनी कर्मानुसार फळ देतो आणि क्षणार्धात एखाद्याचे भाग्यही बदलतो. शनी राजाला रंक आणि रंकाला राजा बनवू शकतो. 23 ऑक्टोबर 2022 रोजी शनीच्या स्थितीत महत्त्वपूर्ण बदल होणार आहे. शनी सध्या स्वतःच्या राशीत मकर राशीत पूर्वगामी म्हणजेच भ्रमण करीत आहे, आणि 23 ऑक्टोबरपासून त्याचे संक्रमण होणार आहे. शनीच्या चालीतील बदलामुळे 3 राशींमध्ये पंच महापुरुष राज योग (Mahapurush Raj Yoga) तयार होईल, जो अत्यंत शुभ मानला जातो. हा महापुरुष राज योग काही राशीच्या जातकांना भरपूर पैसा आणि प्रगती देणार आहे.
मेष : मकर राशीत शनिदेवाच्या संक्रमणाने मेष राशीत पंच महापुरुष राज योग तयार होईल. यामुळे या लोकांना करिअर आणि पैशाच्या बाबतीत विशेष फायदा होईल. त्यांना नवीन नोकरी मिळू शकते किंवा विद्यमान नोकरीतच पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात मोठा नफा होईल. व्यवसाय वाढेल. कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. लोकं तुमच्या कामाने प्रभावित होतील.
धनु: मार्गी शनि धनु राशीच्या लोकांनाही खूप शुभ फल देईल. आतापर्यंत करिअरमध्ये ज्या प्रगतीची तुम्ही वाट पाहत होता, आता तुम्हाला ते यश मिळणार आहे. पगार वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. व्यवसायातही फायदा होईल. नफा वाढेल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मार्केटिंगशी संबंधित लोकांना विशेष फायदा होईल.
मीन: ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या प्रत्यक्ष हालचालीमुळे मीन राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. त्यांचे उत्पन्न वाढेल. वाढीव उत्पन्नामुळे दिलासा मिळेल. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग गावसतील. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. नवीन संपर्क व्यवसाय वाढवण्यास मदत करतील. कार-मालमत्ता खरेदी होण्याची दाट शक्यता आहे.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)