ज्योतिषशास्त्रानुसार शनीची साडेसाती (Sadesati Upay) एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यावर साडेसात वर्षे राहते. शनि सध्या मकर, धनु आणि कुंभ राशीत आहे. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीच्या आधारे शनीची साडेसाती शुभ की अशुभ हे ठरवता येते. ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही जातकाच्या कुंडलीत बलवान शनि व्यक्तीला लाभ देतो. दुसरीकडे, कमकुवत शनि एखाद्यासाठी विविध समस्या निर्माण करतो. अशा वेळी त्याचे वाईट परिणाम टाळण्यासाठी नियमितपणे शनीचे काही उपाय केले जाऊ शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार, न्यायाचे दैवत शनिदेव (Shanidev) चांगली कर्म करणाऱ्यांना शुभ फल प्रदान करतात, तसंच वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षाही देतात. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायदेवता म्हटलं जातं. असं मानलं जातं की शनीची साडेसाती प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात तीनदा येते. ज्यामध्ये साडीसाती ही साडे सात वर्षांची असते. यात अडीच-अडीच वर्षांच्या तीन ढैय्या असता.
लक्षात ठेवा सूर्यास्तानंतर शनिदेवाची पूजा करणे अधिक फलदायी मानले जाते. त्यामुळे शनिदेवाची पूजा आणि शनी ग्रहाचे उपाय हे सूर्यास्तानंतरच करावेत, असा सल्लाही ज्योतिष शास्त्राच्या तज्ज्ञांनी दिला आहे कारण शनिदेवाची वेळ सूर्यास्तानंतरच सुरू होते.
शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. यानंतर शनिदेवाचे ध्यान करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शक्य असल्यास शनिदेव ॐ शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा.
एक वाटी मोहरीचे तेल घ्या. या तेलात आपली प्रतिमा पहा. त्यानंतर हे तेल कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला दान करा. तुम्हाला हवे असल्यास या तेलाचा दिवा लावून शनिदेवाच्या मंदिरात ठेवू शकता. असे केल्याने आरोग्यासही फायदे होतील.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)