Shani Sadesati: शनीची साडेसाती म्हणजे नेमके काय असते? काय होतात याचे परिणाम?

| Updated on: Jan 28, 2023 | 10:15 AM

शनिदेव जेव्हा चंद्र राशीतून पारगमन करतात तेव्हा ती साडेसाती मानली जाते, त्याचा प्रभाव तीस महिन्यांपूर्वीपासून ते तीस महिन्यांपर्यंत आपल्या राशीत प्रवेश केल्यानंतर जाणवतो.

Shani Sadesati: शनीची साडेसाती म्हणजे नेमके काय असते? काय होतात याचे परिणाम?
शनि
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या साडेसातीचे (Shani Sadesati) तीन प्रकार आहेत, पहिला लग्नाशी संबंधित आहे, दुसरा चंद्र लग्न किंवा राशीशी संबंधित आहे आणि तिसरा सूर्य लग्नाशी संबंधित आहे. उत्तर भारतात चंद्रावरून शनीची साडेसाती काढण्याची पद्धत प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. यानुसार शनिदेव जेव्हा चंद्र राशीतून पारगमन करतात तेव्हा ती साडेसाती मानली जाते, त्याचा प्रभाव तीस महिन्यांपूर्वीपासून ते तीस महिन्यांपर्यंत आपल्या राशीत प्रवेश केल्यानंतर जाणवतो. साडेसातीच्या वेळी, शनी एखाद्या व्यक्तीने केलेल्या भूतकाळातील कर्माचा हिशोब घेतो, ज्याप्रमाणे घराची संपूर्ण जबाबदारी घेणार्‍या व्यक्तीला काही काळानंतर हिशेब मागितला जातो आणि चूक केल्याबद्दल त्याला कोणत्या प्रकारची शिक्षा मिळते असेच काहीसे साडेसातीच्या काळात घडते.

 

साडेसातीत केवळ त्रास होतोच हा केवळ गैरसमज

साडेसातीमुळे केवळ दुःख किंवा त्रासच होतो असे नाही, तर या काळात फक्त कर्माचे फळ मिळत असते. ज्यांनी भूतकाळात सत्कर्म केले आहे, लोकांची मदत केली आहे, कुणाचेच वाईट केलेले नसेल त्यांंच्यासाठी हा काळ सुवर्ण काळ असतो. राजा विक्रमादित्य, राजा नल, राजा हरिश्चंद्र अशी शनीच्या साडेसातीची अनेक उदाहरणे आहेत. साडेसाती तीस वर्षांतून एकदा प्रत्येक माणसावर नक्कीच येते. धनु, मीन, मकर किंवा कुंभ राशीत असेल तर त्रास कमी होतो, पण चौथ्या, सहाव्या, आठव्या, बाराव्या राशीत असेल तर मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या त्रास होतो. मात्र हे सर्वस्वी प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून असते.

हे सुद्धा वाचा

या गोष्टी लक्षात ठेवा

साडेसातीमध्ये चुकूनही नीलम धारण करू नये, अन्यथा लाभाऐवजी नुकसान होण्याची शक्यता असते, असे म्हणतात. कोणतेही नवीन काम, नवीन उद्योग साडेसात वर्षांत करणे टाळावे, कोणतेही काम करण्यापूर्वी जाणकार ज्योतिषाकडून माहिती घ्यावी. असे देखील आढळून आले आहे की जेव्हा जेव्हा शनि चतुर्थ, सहाव्या, आठव्या आणि बाराव्या घरात प्रवेश करतो तेव्हा व्यक्तीच्या मूळ संपत्तीचा नाश होतो. म्हणूनच शनीच्या या मुहूर्ताचा अगोदरच विचार करावा जेणेकरुन धनाचे रक्षण करता येईल.

शनीचा प्रकोप कसा टाळावा

पंडित आणि ज्योतिषांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने जप, तपश्चर्या आणि जे काही नियम सांगितले आहेत ते साडेसाती सुरू होण्यापूर्वी करावे. शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी रावणाने आपल्या बंदिवासात पाय बांधून आपले डोके खाली ठेवले होते जेणेकरून शनिदेवाची वक्र दृष्टी रावणावर पडू नये. आजही जाणूनबुजून किंवा नकळत रावणाप्रमाणे अनेक लोकं प्रतिकात्मकरीत्या शनीचे रूप धारण करतात. जर तुम्ही पौराणिक मान्यता आणि विद्वानांच्या सूचनांचे पालन केले तर या काळात हनुमानजींची पूजा करणे खूप फायदेशीर आहे, कारण शनिदेवाने त्यांना वचन दिले होते की हनुमान भक्तांना शनीच्या वाईट नजरेचा त्रास होणार नाही.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)