शनिदेव
Image Credit source: Social Media
मुंबई, ज्योतिषशास्त्रानुसार, कोणत्याही ग्रहाच्या संक्रमणाला विशेष महत्व आहे. याचा थेट परिणाम सर्व राशीच्या राशीच्या लोकांवर होतो. 17 जानेवारी रोजी, न्यायाची देवता शनीचे (Shani Transit 2023) कुंभ राशीत संक्रमण होणार आहे. अशा स्थितीत काही राशीचे लोकं साडेसाती आणि अडिचकीच्या महादशापासून मुक्त होतील. 16 जानेवारीचा काळ काही राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसेल.
ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेवाची वक्रदृष्टी त्रासदायक असते. तसेच शनिदेव जर एखाद्यावर प्रसन्न झाले तर त्याचे दिवस बदलायला वेळ लागत नाही.
16 जानेवारीपर्यंत शनिदेव मकर राशित असणार आहेत. यानंतर ते 17 जानेवारीला 30 वर्षांनंतर, कुंभ राशित प्रवेश करतील. 16 जानेवारीपर्यंतचा काळ वृषभ, वृश्चिक, मीन राशिंच्या लोकांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नसेल.
जाणून घेऊया या राशींना काय फायदा होणार आहे
- वृषभ- ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. या काळात वृषभ साशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. या काळात केलेल्या मेहनतीचे त्यांना पूर्ण फळ मिळेल. एवढेच नाही तर त्या व्यक्तीला कौटुंबिक सुख आणि समृद्धीही मिळेल. या काळात घर अथवा वाहन आदी खरेदी करू शकता. मेहनतीचे फळ मिळेल. शिक्षणाशी संबंधित लोकांसाठीही हा काळ शुभ असणार आहे.
- वृश्चिक- या राशीच्या लोकांना त्यांच्या सर्व कार्यात यश मिळेल. या काळात त्यांची आर्थिक बाजू भक्कम राहील. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील, तसेच नशिबाचीही पूर्ण साथ मिळेल. कुटुंबासोबत हा काळ चांगला जाईल. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना शनिदेवांची विशेष कृपादृष्टी राहील. मात्र, 16 जानेवारीनंतर या राशीच्या लोकांवर शनी अडिचकीचा प्रकोप सुरू होईल.
- मीन- ज्योतिषशास्त्रानुसार शनि मकर राशीत असल्याने मीन राशीच्या लोकांना शत्रूंवर विजय मिळवता येईल. या काळात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 16 जानेवारीपर्यंतचा काळ या राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसेल. आपल्याला लवकरच आरोग्याशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल. जे लोक परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांना या काळात यश मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)