मुंबई, वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या 9 ग्रहांमध्ये शनिदेवाला (Shanidev) महत्त्वाचे स्थान आहे. शनिदेवाला कर्माचा दाता आणि न्याय देवता म्हटले जाते. शनिवार हा शनिदेवाची पूजा (Worship) आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी करावयाच्या उपायांसाठी (Shani Upay) समर्पित आहे. असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती चांगले कर्म करते तेव्हा शनिदेव प्रसन्न होतात आणि त्याला आशीर्वाद देतात. ज्यांच्यावर शनिदेवाची कृपा असते, त्यांना जीवनातील सर्व सुख प्राप्त होते.
ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, 23 ऑक्टोबर रोजी शनिदेव मकर राशीत प्रतिगामी होणार आहेत आणि 17 जानेवारी 2023 पर्यंत ते मकर राशीत पारगमन स्थितीत राहतील. त्यानंतर 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेव कुंभ राशीत प्रवेश करतील. अशा स्थितीत शनिदेव मकर राशीत बसून या राशींचे भाग्य उजळतील.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)