मुंबई : ज्योतिषशास्त्रात शनिच्या स्थिती खूपच महत्त्वाची ठरली जाते. शनिदेवांची गणना पापग्रहांमध्ये केली जाते. पण असलं तरी शनिदेव न्यायदेवता असल्याने चांगल्या कर्माची चांगलं फळं देतात. शनि हा ग्रह सर्वात मंदगतीने मार्गस्थ होतो. त्यामुळे त्याच्या स्थितीचा फटका राशीचक्रावर दीर्घ काळासाठी होतो. शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत विराजमान असून जूनपासून वक्री स्थितीत होते. त्यामुळे काही राशीच्या जातकांना जबरदस्त फटका बसला होता. आता 4 नोव्हेंबरला शनिदेव मार्गस्थ होणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी 8 वाजून 26 मिनिटांनी कुंभ राशीत मार्गस्थ होणार आहेत.
वृषभ : शनि मार्गी होताच त्याचा शुभ प्रभाव या राशीच्या जातकांवर पडेल. कारण शनिदेव या राशीच्या कर्मस्थानात मार्गस्थ होणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांनाी नोकरी आणि उद्योगात सकारात्मक परिणाम दिसून येतील. आत्मविश्वासात वाढ होईल. एखादी योजना प्रभावीपणे राबवू शकता. जमिन, घर किंवा वाहन खरेदीसाठी योग्य काळ असेल.
मिथुन : 4 नोव्हेंबरनंतर बरेच बदल दिसून येतील. थोड्याशा मेहनतीने चांगलं फळ हाती मिळू शकते. आर्थिक स्थितीत झपाट्याने बदल होईल.न्यायालयीन प्रकरणात यश मिळेल. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून असलेलं टेन्शन दूर होईल. समाजात मानसन्मान वाढेल. आर्थिक व्यवहार करताना जोखित किती आहे, याचा विचार करा. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पाऊल टाका.
तूळ : पाच सहा महिन्यापूर्वी अडीचकीतून सुटका झाली खरी पण शनिचं हवं तसं पाठबळ मिळालं नव्हतं. आता खऱ्या अर्थाने लाभ मिळण्यास सुरु होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन मिळू शकते. अचानक होणाऱ्या बदलामुळे तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. ग्रहांची उत्तम साथ या काळात मिळेल.
कुंभ : या राशीत शनि मार्गस्थ होणार असल्याने आत्मविश्वास दुपटीने वाढेल. मोठे निर्णय झटपट घ्याल. तसेच घेतलेले निर्णय पूर्णत्वास न्याल. नोकरी करणाऱ्या जातकांना नवीन संधी चालून येतील. व्यवसायात प्रगती दिसून येईल. तसेच आर्थिक ओघ वाढेल आणि त्याचा थेट फायदा होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)