मुंबई, ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला आपल्या कर्मानुसार फळ देणारी देवता मानली जाते. जेव्हा ते एखाद्यावर प्रसन्न होतात तेव्हा त्या व्याक्तीच्या आयुष्यात फक्त सुखच सुख असतं. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा त्याची हालचाल होते तेव्हा त्याचा परिणाम सर्वच राशींच्या जातकांवर दिसून येतो. आता पुढील महिन्यात 9 मार्चला शनिचा (Shani Uday) उदय होणार आहे. त्या दिवशी तो कुंभ राशीत प्रवेश करेल. त्याच्या प्रभावामुळे 4 राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रगती आणि संपत्तीची शक्यता निर्माण होत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी.
शनिदेव तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या भागात उदयास येणार आहे. यामुळे तुम्ही कोणतेही काम कराल, त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना यश मिळू शकते. परदेशात जाण्याची शक्यता आहे.
शनिदेव तुमच्या राशीच्या सातव्या घरात विराजमान आहेत. या शुभ प्रभावाने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. एखादा मोठा व्यवसाय करार निश्चित होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराची प्रगती होऊ शकते. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील.
शनीच्या उदयामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसाय आणि राजकारणाशी संबंधित लोकांना त्यांच्या करिअरमध्ये नवीन यश मिळू शकते. मूल होण्याची इच्छा असलेल्या जोडप्यांच्या आशा पूर्ण होऊ शकतात. घरामध्ये सुखसोयींचे आगमन होईल. लग्नासाठी प्रस्ताव येऊ शकतात.
शनिदेव कर्म आणि भाग्याचे स्वामी आहेत. त्याचा उदय तुमच्यासाठी खूप भाग्यवान असेल. नोकरदारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. पालकांशी संबंध सुधारू शकतात. तुमचे उत्पन्न वाढू शकते. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेऊ शकता.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)