मुंबई : कर्म दाता शनिदेवाच्या प्रकोपामुळे मनुष्याच्या जीवनात नोकरी, व्यवसाय, आरोग्याशी संबंधित समस्या येत राहतात. आपल्या पुराणात शनिदेवाला सूर्यपुत्र आणि कर्माचे फळ देणारे म्हटले आहे. शनि हा एक असा ग्रह आहे जो तुमचे नशीब उजळवून तुम्हाला राजा बनवू शकतो आणि दुसरीकडे कोपला असेल तर राजाला रंकही बनवू शकतो. हे सर्व तुमच्या कुंडलीतील शनीच्या स्थितीवर अवलंबून असते. त्यामुळे शनीच्या अडिचकी किंवा साडेसतीमुळे प्रभावित लोकं खूप अस्वस्थ होतात. जेव्हा शनि अशुभ फळ देतो तेव्हा व्यक्तीवर वाईट काळ येतो आणि जीवनात संघर्ष करावा लागतो. या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनिदेवाची विशेष पूजा करणे आणि काही उपाय (Shani Upay) करणे फायदेशीर असल्याचे सांगण्यात आले आहे. शनिवारी कोणते उपाय करावेत जेणेकरून शनि शुभ फळ देईल.
शनिवारी एका लोखंडी भांड्यात मोहरीचे तेल घ्या आणि त्यात तुमचा चेहरा पहा. यानंतर हे तेल शनि मंदिरात दान करा. शनिवारपर्यंत सतत असे काही केल्याने शनिशी संबंधित समस्या बर्याच अंशी दूर होतात. याशिवाय शनिवारी ब्रेडवर मोहरीचे तेल लावून काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.
जीवनातील संकटांपासून मुक्त होण्यासाठी शनिवारी एक किलो सप्तधान, अर्धा किलो काळे तीळ, अर्धा किलो काळे हरभरे, काही लोखंडी खिळे, मोहरीच्या तेलाची एक कुपी या सर्व गोष्टी निळ्या कपड्यात बांधून त्याची गाठोडी करावी. शनिदेवाची प्रार्थना करून ही गाठोडी शनि मंदिरात दान करा.
शनिवारी ‘ओम प्राण प्रथम प्रौं स: शनैश्चराय नमः’ आणि ‘ओम शं शनिश्चराय नमः’ या दोन मंत्रांचा जास्तीत जास्त जप करा.शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनि चालीसा आणि शनिदेवाची आरतीही करा. शनिदेवाच्या प्रसन्नतेसाठी व्यक्तीने शनिवारी व्रत पाळावे आणि गरीब लोकांना मदत करावी, असे केल्याने जीवनातील संकटे दूर होतात.
शनिवारी सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पीपळाची पूजा केल्यास शनिदेवाच्या कृपेसोबतच लक्ष्मीची कृपाही तुमच्यावर राहते. यासोबतच भगवान श्रीकृष्णाने पीपळाचे स्वतःचे रूप सांगितले आहे, शनिदेव हे कृष्णाचे परम भक्त देखील आहेत. अशा स्थितीत शनिवारी पिंपळाची पूजा केल्याने ते खूप प्रसन्न होतात आणि भक्तांचे दुःख दूर करतात.
हनुमानजींची पूजा करणाऱ्यांवर शनिदेव नेहमी प्रसन्न राहतात, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शनिपूजेसोबतच हनुमानजींचीही पूजा करावी. शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर सूर्यास्तानंतर हनुमानजीची पूजा करून हनुमान चालीसा किंवा सुंदरकांड पाठ करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)