नवं वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवश शिल्लक राहिले आहेत. नवं वर्ष आपल्याला कसं जाणार? नव्या वर्षात आपल्यासोबत कोणत्या घटना घडणार? नवं वर्ष चांगलं जावं यासाठी काय करावं असे प्रश्न अनेकांना पडतात. काही जण तर नव्या वर्षात आपल्या सोबत काय घटना घडणार आहेत? नव वर्ष आपल्यासाठी कसं जाणार आहे? या उत्सुकतेपोटी ज्योतिषाचा सल्ला देखील घेतात. ज्योतिष शास्त्रावर विश्वास असणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे लवकरच शनी ग्रह नक्षत्र परिवर्तन करणार आहे. नव्या वर्षाला प्रारंभ होण्यापूर्वीच म्हणजे 27 डिसेंबरला शनी देव नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. शनी देवांच्या नक्षत्र परिवर्तनाचा नव्या वर्षात तीन राशींना मोठा फायदा होणार आहे.
शनीला न्यायाची देवता तसेच कर्मफल दाता देखील म्हटलं जातं. शनी पूर्व भाद्रपदा नक्षत्रामध्ये 27 डिसेंबरला प्रवेश करणार आहे. या नक्षत्र परिवर्तनाचा लाभ हा तीन राशींना नव्या वर्षात मिळणार आहे. जाणून घेऊयात त्या राशींबद्दल
मेष रास – या राशींचे लोक जर नोकरी करत असतील तर नव्या वर्षांमध्ये त्यांच्या प्रमोशनाचा योग बनत आहे. ऑफिसमध्ये तुमच्या कार्याचं कौतुक होईल. प्रगतीचे नवे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील. या काळात कुटुंबाची पूर्ण साथ तुम्हाला मिळेल. अनेक दिवसांपासून अडलेलं एखादं मोठं काम या काळात होऊ शकतं.
तुळ रास – शनीचं नक्षत्र परिवर्तन या राशींच्या लोकांसाठी खूपच शुभकारी असणार आहे. तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. उत्पन्नाचं एखादं नवं साधन तुम्हाला नव्या वर्षात मिळू शकतं. तसेच या राशींच्या विद्यार्थ्यांसाठी देखील नवं वर्ष हे खूप काही देऊन जाणारं आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगतीचा योग आहे.
कुंभ रास – कुंभ राशीला देखील शनीच्या परिवर्तनाचा मोठा फायदा होणार आहे. तुम्ही जर कुठे गुंतवणूक केलेली असेल तर तिच्यापासून तुम्हाला या काळात मोठा फायदा मिळू शकतो. नोकरीमध्ये देखील प्रमोशनचा योग आहे.
(डिस्क्लेमर: वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)