मुंबई : हिंदू दिनदर्शीकेनुसार, चतुर्थीचा उपवास दर महिन्यात दोनदा केला जातो. ज्यामध्ये पहिल्या चतुर्थीला विनायक चतुर्थी (Vinayak Chaturthi Shrawan 2023) आणि दुसऱ्याला संकष्ट चतुर्थी म्हणतात. सध्या अधिकमहीना सुरू आहे. तसेच या महिन्याला अधिक श्रावण देखील म्हणतात. अशा परिस्थितीत श्रावण महिन्यात येणारी ही विनायक चतुर्थी अत्यंत महत्त्वाची ठरते. या दिवशी काही राशींवर भगवान विष्णू, भगवान शिव शंकर आणि भगवान गणेश यांचा आशीर्वाद वर्षाव होईल. काही राशीच्या जातकांना बाप्पाच्या कृपेने शुभ वार्ता मिळेल.
अनेक दिवसांपासून अडकलेले महत्त्वाचे काम आज पूर्ण करू शकाल. श्रीगणेशाच्या कृपेने तुमची एखादी जुनी योजना मार्गी लागेल. आजचा दिवस तुमच्या मनाला आनंद देईल. एखाद्या प्रिय व्यक्तीची गाठ-भेट होण्याची शक्यता आहे. तुमच्या स्वभावामुळे लोकं तुमच्याकडे आकर्षित होतील.
आज तुम्ही भविष्यासाठी काही योजना आखाल. या योजनांचा भविष्यात फायदा होईल. आज तुम्हाला अधिक निरोगी वाटेल. नवीन उर्जेच्या संचारामुळे प्रलंबित कामे लवकर पूर्ण कराल. दिवसाच्या शेवटी समाधानी असाल.
परोपकारासाठी आजचा दिवस चांगला राहील. तुमची प्रगती काही लोकांना त्रास देईल. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आज बोलताना सावध राहा, तुम्ही एखाद्याला दुखवू शकता. जुणी येणी वसूल होईल.
आज स्वतःसाठी काही खरेदी करण्याचा दिवस आहे. गणरायाच्या कृपेने सर्व अडणींवर यशस्वीपणे मात कराल. जर काही गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. प्रेमावर विश्वास ठेवा.
आज गणरायाच्या कृपेने काही आनंदवार्ता एकायला मिळू शकते. जोडीदाराशी बोलताना काळजीपूर्वक बोलणे लक्षात ठेवा, अन्यथा त्रास होऊ शकतो. तुमच्या मनात काही चिंता असेल तर ध्यान केल्याने आराम मिळेल. वडिलोपार्जीत मालमत्तेचे प्रकरण मार्गी लागेल.
रिकाम्या लोकांसोबत वेळ वाया घालवू नका. आज उत्साहाने नवीन कामाला सुरूवात करा. भांडण करण्याऐवजी वाद मिटवणे योग्य ठरेल.
जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर ते व्यक्त करण्याचा आजचा दिवस उत्तम आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)