मुंबई, शुक्र 15 फेब्रुवारीला मीन राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 12 मार्चपर्यंत शुक्र या राशीत राहील (Shukra Gochar 2023). वैदिक ज्योतिष शास्त्रात मीन राशीतील शुक्राचे संक्रमण खूप महत्वाचे आहे. शुक्र हा भौतीक सुख देणारा ग्रह आहे आणि तो मीन राशीत उच्च स्थितीत आहे. शुक्र जेव्हा उच्च स्थितीत असतो तेव्हा सर्व प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध होतात. जाणून घेऊया कोणत्या राशीसाठी आगामी शुक्र गोचर शुभ परिणाम देणार आहे.
कर्क- शुक्राचे हे संक्रमण तुमच्या राशीच्या घरात गुरु ग्रहाच्या उपस्थितीमुळे तुमचे भाग्य वाढवेल. तुमच्या अडचणी कमी होतील. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळतील. पैशाअभावी एखादे काम दीर्घकाळ रखडले असेल तर ते आता पूर्ण होईल. नोकरी बदलण्यातही तुम्हाला यश मिळू शकते. या दरम्यान तुम्हाला मोठी संधी मिळू शकते.
सिंह- शुक्राच्या भ्रमणानंतर तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्याकडे अचानक पैसा येईल अशी अपेक्षाही तुम्ही केली नसेल. या काळात तुम्हाला पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते.
कन्या- कन्या राशीच्या लोकांच्या व्यवसायात वाढ होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी फिरायला देखील जाऊ शकता. नोकरीत पदोन्नतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तब्येत सुधारेल. तुमचे व्यक्तिमत्व फुलेल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. मित्र आणि नातेवाईकांशी मतभेद किंवा नाराजी दूर होईल.
वृश्चिक- या संक्रमणामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. तुम्ही शिक्षणासाठी परदेशातही जाऊ शकता. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले परिणाम मिळतील. तुमच्या मेहनतीचे सार्थक होईल. जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल. हा काळ तुम्हाला आनंदाने भरून जाईल.
कुंभ- करिअरसाठी हा काळ अनुकूल राहील. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून लाभ होईल. लांबच्या प्रवासातून धनलाभ होण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्समध्ये वाढ होईल. घरात लग्न किंवा काही कार्य असू शकते किंवा मुलाचा जन्म होऊ शकतो. पार्ट्या आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची संधी मिळेल. स्वादिष्ट पदार्थ खाण्याची संधी मिळेल.
मीन- हे संक्रमण तुमच्या वैवाहिक जीवनासाठीही खूप शुभ ठरेल. व्यवसायातही वाढ होण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यवसायात प्रगती होईल आणि तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या योजनाही यशस्वी होतील. या काळात तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता, तुम्हाला त्यात चांगले यश मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)