मुंबई : राशीचक्रात थोड्या थोड्या अंतराने उलथापालथ होत असते. त्यामुळे आजची स्थिती उद्या कायम राहील असं नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या स्थितीचा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम होत असतो. त्यामुळे कालपर्यंत सर्वकाही ठीक होतं, आज अचानक कसं काय बदललं असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. अनेकदा वाचलेलं असतं की ग्रह चांगले आहेत मग अचानक ग्रहमान कसं बदललं. तर ग्रह एका ठिकाणी कायमस्वरुपी स्थित नसतात. ग्रह वेगवेगळ्या राशीत गोचर करतात त्यामुळे त्याची फळ वेगवेगळी असतात. आता 6 एप्रिलला शुक्र वृषभ राशीत गोचर करणार आहे. ही शुक्राची स्वरास आहे.
शुक्राच्या या गोचरामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. हा शुभ योगांपैकी एक योग आहे. शुक्र आपल्या स्वराशीत किंवा उच्च राशीच्या चतुर्थ स्थानात असेल तर हा योग तयार होतो. मालव्य राजयोगामुळे जीवन आनंददायी होते. कामावर लक्ष केंद्रीत राहिल्याने फायदा होतो. या स्थितीचा तीन राशींना फायदा होणार आहे.
वृषभ – या राशीच्या जातकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. कारण शुक्र या राशीचा स्वामी आहे. त्याचबरोबर लग्न राशीत गोचर करणार असल्याने फायदा होईल. या काळात आत्मविश्वास दुणावेल. तसेच आर्थिक स्थिती एकदम रुळावर आलेली दिसेल. केलेल्या मेहनतीला अपेक्षित यश मिळेल. राजयोगाची दृष्टी सातव्या स्थानावर पडणार असल्याने जोडीदाराची चांगली साथ मिळेल.
सिंह – या राशीच्या तिसऱ्या आणि दहाव्या स्थानाचा स्वामी शुक्र आहे. तिसरं स्थान भाई बहिण, साहस आणि प्रवास दर्शवतो. तर दहावं स्थान मान सन्मान, प्रतिष्ठा आणि संधी दर्शवतो. त्यामुळे या राशीच्या जातकांना निश्चितच फायदा होईल.नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. तसेच कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. वडिलांकडून तुम्हाल चांगलं सहकार्य मिळू शकतं.
मेष : या राशीच्या जातकांसाठी शुक्र गोचर कुंडलीतील दुसऱ्या आणि अकराव्या स्थानाचा स्वामी आहे. शुक्र सामान्यत: संपत्ती आणि लक्झरी लाईफ दर्शवतो. त्यामुळे धनलाभाच्या दृष्टीने हा काळ खूप चांगला आहे. या गोचर कालावधीत काही इच्छा पूर्ण करणे सहज शक्य होईल. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा अधिक मजबूत होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रेम प्रकरणात यश मिळू शकतं.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)