मुंबई – ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा शुभ ग्रह म्हणून गणला जातो. या ग्रहाची साथ असेल तर धन, संपत्ती आणि भौतिक सुख मिळतं. त्यामुळे शुक्राची स्थिती कुंडलीत चांगली असलेल्या जातकांना चांगलं आयुष्य उपभोगायला मिळतं. त्यामुळे शुक्राची कुंडलीतील स्थिती आणि गोचर कालावधीकडे ज्योतिष बारकाईने बघतात. शुक्र ग्रहाने 6 एप्रिल 2023 रोजी आपली स्वरास असलेल्या वृषभ राशीत प्रवेश केला आहे. या राशीत शुक्र महिनाभर असणार आहे. त्यामुळे 12 राशींवर या गोचराचा परिणाम दिसून येईल. तीन राशींना या गोचराचा फायदा होईल.
वृषभ – या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. या राशीत शुक्राने गोचर केलं आहे. त्यामुळे व्यक्तिमत्त्वात फरक दिसून येईल. या काळात जोडीदारासोबत एखादा बिझनेस सुरु करू शकता. बाहेरगावी फिरायला जाण्याचा योग जुळून येईल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. नोकरीच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. जोडीदारासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील.
कर्क – या राशीच्या उत्पन्न भावात शुक्राचं गोचर आहे. त्यामुळे शुक्राची चांगली साथ या राशीच्या जातकांना मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम असेल. काही करार या काळात निश्चित होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. शेअर बाजार, लॉटरी या माध्यमातून अचानक धनलाभ होऊ शकतो. न्यायालयीन प्रकरणातही यश मिळेल.
तूळ – शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन अष्टम स्थानात होणार आहे. या काळात करिअर आणि नोकरीत चांगलं यश मिळताना दिसेल. नवा बिझनेस सुरु करण्यासाठी हा काळ उत्तम असेल. कौटुंबिक वातावरण या काळात चांगलं राहील. पती पत्नीमध्ये संवाद वाढेल. जे जातक फिल्म लाइन, मीडिया, कला आणि संगीताशी निगडीत आहेत त्यांना शुक्राचं बळ मिळेल. त्याचबरोबर अडकलेली कामं मार्गी लागतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)