मुंबई : कुंडलीत शुक्राचं स्थान मजबूत असेल तर जातकाला पैशांची कधीच उणीव भासत नाही. त्यामुळे शुक्राचं स्थान कसं आहे याकडे ज्योतिष आवर्जुन लक्ष वेधतात. वैयक्तिक कुंडलीसोबत सद्यस्थिती असलेली गोचर कुंडलीही महत्त्वाची ठरते. शुक्र ग्रह हा सौंदर्य, ऐश्वर्य आणि धनसंपदेचा कारक ग्रह आहे. 6 एप्रिल रोजी शुक्र ग्रह आपली स्वरास असलेल्या वृषभमध्ये प्रवेश करणार आहे. या राशीत शुक्रदेव 2 मे पर्यंत राहणार आहेत. त्यामुळे काही राशींना शुभ तर काही अशुभ फळं भोगावी लागतील.
मेष – शुक्राने वृषभ राशीत प्रवेश करताच मेष राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच गेल्या काही दिवासांपासून अडकलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. या काळात निर्णयक्षमताही वाढलेली दिसून येईल. कामाच्या निमित्ताने विदेशवारी करण्याचा योग जुळून येईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच प्रेम प्रकरणात शुक्राची साथ मिळेल. संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळेल.
वृषभ – शुक्राची ही स्वरास असून या राशीत शुक्र चांगली फळं देईल. या काळात नवं काम हाती घेण्यास हरकत नाही. जुन्या गुंतवणुकीतून या काळात चांगला फायदा होईल. एकंदरीत या काळात मनासारखे परिणाम दिसून येतील. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील.
कर्क – या राशीच्या जातकांनाही शुक्राची साथ लाभेल. नव्या संधी चालून येतील. तसेच केलेल्या कामाचं योग्य फळ मिळेल. बॉसकडून कौतुकाची थाप पाठीवर पडेल. व्यवसायिकांसाठी हा काळ सर्वात बेस्ट असणार आहे. नव्या व्यापाऱ्याच्या संधी मिळू शकतात. सेव्हिंग चांगली झाल्याने कौटुंबिक वातावरण चांगलं राहिल.
कन्या – या राशींना शुक्र ग्रह शुभ फळं देणार आहे. कामानिमित्त बाहेरगावी जाण्याचा योग जुळून येईल. व्यवसायिकांना या गोचरामुळे आर्थिक लाभ होईल. पैशांची देवाणघेवाण या काळात मोठ्या प्रमाणात होईल. तसेच अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात अपेक्षित यश मिळेल.
मकर – या राशीच्या जातकांनाही शुक्र आशीर्वाद देईल अशीच स्थिती आहे. ज्या कामात हात घालात ते काम चुटकीसरशी पूर्ण कराल. किचकट कामंही तुम्ही झटपट उरकाल. व्यवसायिकांसाठी हा गोचर फलदायी असणार आहे. या काळात पैसे कमवण्याची चांगली संधी असणार आहे.
कुंभ – गोचर कुंडलीनुसार या राशीसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात चांगलं फळ मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच आजारपणामुळे त्रस्त असलेल्यांना दिलासा मिळेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)