मुंबई : पैशांची गरज ही प्रत्येक व्यक्तीला असते, पैशाशिवाय जीवन जगण्याची कल्पना कोणीच करू शकत नाही. त्यामुळे पैसा हा प्रत्येकासाठी खूप गरजेचा आहे. त्यासाठी प्रत्येकजण पैसे कमवण्यासाठी काहीना काही धडपड करत असतं, मेहनत करत असतं. त्यात लोकं जास्तीत जास्त पैसे कमवण्यावर भर देत असतात. तसंच बहुतेक लोक पैशांची बचत करताना दिसतात. यासाठी लोक अनेक वेगवेगळे उपाय करून पैशांची बचत करत असतात.
मनी प्लांट – तुम्ही तुमच्या घरात मनी प्लांट लावा. जर तुमचं घर मोठं असेल तर तुम्ही मोठी झाडं लावू शकता. मनी प्लांट हा तुमच्या घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला लावा. यामुळे धनाची देवी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहते. तसंच तुम्ही कमावलेले पैसे टिकून राहतील.
दक्षिण किंवा नैऋत्य भिंत – तुमच्या घरी जर पैशांची तिजोरी असेल तर ती तिजोरी दक्षिण किंवा नैऋत्य भिंतीजवळ ठेवा. यामुळे तुम्ही जेव्हाही तिजोरी उघडाल तेव्हा त्याचे तोंड उत्तरेकडे असेल. शास्त्रानुसार भगवान कुबेर हे उत्तर दिशेला राहतात. तसंच त्यांना धनाची देवता मानली जाते.
घर स्वच्छ ठेवा – तुमच्या घरात जर धनाची देवता यायची असेल तर तुमचं घर नेहमी स्वच्छ ठेवा. तुमच्या घराचे दरवाजे, खिडक्या नेहमी स्वच्छ, नीट ठेवा. तसंच घरातील खराब झालेल्या वस्तू बाहेर फेकून द्या. घर स्वच्छ ठेवलं तर धनाची देवता तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहते.
तिजोरीवर काहीही ठेवू नका – घरात तुमच्या तिजोरीवर कोणतीही वस्तू ठेवू नका. नाहीतर याचा परिणाम तुमच्या उत्पन्नावर होईल. तुम्ही तिजोरी कुठेही ठेवली तरी त्यावर जड वस्तू ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार तिजोरीवर जड वस्तू ठेवली तर त्याचा परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो. त्यामुळे तिजोरीवर वस्तू न ठेवण्याचा प्रयत्न करा.