Surya Gochar 2025: मकरसंक्रांती नंतर ‘या’ ४ राशीच्या लोकांचे भाग्य खुलणार

| Updated on: Jan 10, 2025 | 2:20 PM

मकर संक्रांतीला सूर्य ग्रह मकर राशीत प्रवेश करेल. त्यानंतर सूर्याच्या परिवर्तनाने काही काळ या राशींसाठी खूप चांगला असणार आहे. काही राशींना प्रत्येक क्षेत्रात लाभ होताना दिसेल. अशावेळी जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत, मकर संक्रांतीनंतर कोणाचा चांगला काळ सुरू होणार आहे.

Surya Gochar 2025: मकरसंक्रांती नंतर या ४ राशीच्या लोकांचे भाग्य खुलणार
Follow us on

ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्य ग्रहाला सर्व नऊ ग्रहांचा स्वामी मनाला जातो. दरम्यान ज्योतिषी आणि पंडित सूर्याच्या प्रत्येक हालचालीवर आणि चालीवर विशेष लक्ष ठेवतात. यावर्षी 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीपूर्वी सूर्य देव आपले नक्षत्र बदलून आपली चाल बदलणार आहेत. या नक्षत्रबदलाचा देश, जग, हवामानासह सर्व राशींवर परिणाम होणार आहे. सूर्य हा अग्नी तत्व ग्रह आहे, जो आत्मा, चैतन्य, नेतृत्व, प्रतिष्ठा, ऊर्जा, शक्ती, स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा स्वामी आणि नियंत्रक ग्रह आहे. म्हणूनच कुंडलीतील सूर्याच्या स्थितीचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर, आरोग्यावर, करिअरवर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर खोलवर परिणाम होतो.

मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. या दिवशी सूर्य हा मकर राशीत परिवर्तन करणार आहे. मकर संक्रांतीला स्नान आणि दान करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. जो कोणी या दिवशी स्नान आणि दान करतो त्याला पुण्यफळ मिळते.

यावर्षी सूर्य 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे. 14 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजून 3 मिनिटांनी नऊ ग्रहांचा असलेला स्वामी सूर्य ग्रह मकर राशीत प्रवेश करेल. अशा तऱ्हेने यंदा 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी लोक पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करून भगवान सूर्याची पूजा करतात. असे मानले जाते की या दिवशी भगवान सूर्या देवाला तीळ अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो. मकर संक्रांतीला सूर्याचे मकर राशीत होणारे संक्रमण ज्योतिषशास्त्रात नमूद केलेल्या सर्व 12 राशींच्या लोकांवर परिणाम करेल, परंतु काही राशी अशा आहेत ज्यांचे नशीब मकर संक्रांतीनंतर खुलणार आहे. मकर संक्रांतीनंतर या राशींना चारही बाजूंनी यश मिळेल. चला जाणून घेऊया कोणत्या राशी आहेत.

मेष रास

मेष राशीच्या लोकांचा 14 जानेवारी नंतर म्हणजेच मकर संक्रांतीनंतर चांगला काळ सुरू होईल. सूर्य ग्रहाच्या परिवर्तनाने मेष राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ मिळेल. तसेच तुम्ही या दिवशी जमीन, इमारत, वाहन खरेदी करू शकता.

सिंह रास

मकर संक्रांतीनंतर सिंह राशीच्या लोकांचे भाग्य खुलणार आहे. कारण मकर संक्रांतीनंतर सूर्य ग्रहाच्या परिवर्तनाने तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. व्यावसायिकांच्या व्यवसायात वाढ होऊ शकते. मुलांकडून काही चांगली बातमी मिळण्याची देखील शक्यता आहे.

मकर रास

मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. अशा तऱ्हेने मकर संक्रांतीनंतरचा काळ मकर राशीच्या लोकांसाठी खूप चांगला मानला जातो. तब्येतीत सुधारणा होईल. आरोग्यात बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येतील. करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास

सूर्याचे मकर राशीत परिवर्तन झाल्यानंतरचा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. वृश्चिक राशीच्या लोकांचे इच्छित यश प्राप्त होणार असून तुमचे धाडस वाढेल. नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यात देखील यशस्वी व्हाल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)