मुंबई : सूर्य हा आत्मा, जीवन आणि उर्जेचा एकमेव स्त्रोत मानला जातो. सूर्य हा ग्रहांचा राजा आहे, जो संपूर्ण जगाला ऊर्जा आणि शक्ती प्रदान करतो. तो एक तेजस्वी ग्रह आहे, जो मनुष्याच्या इच्छाशक्ती, चेतना आणि एकूण भावनांवर प्रभाव टाकतो. म्हणूच त्याला पित्याची उपमादेखील दिली जाते. त्यांचे वर्तमान राशी सोडून दुसर्या राशीत प्रवेश केल्याने सर्व 12 राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. आता तो आपली सिंह राशी सोडून 17 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7:11 वाजता कन्या राशीत प्रवेश करणार आहेत (Sun transit). या संक्रमणामुळे 4 राशीच्या लोकांच्या जीवनात समृद्धी येईल. चला जाणून घेऊया त्या कोणत्या राशी आहेत.
राज्यशास्त्र किंवा उच्च पदवी घेणार्या विद्यार्थ्यांसाठी ही वेळ अधिक अनुकूल असणार आहे. त्यांना त्यांच्या आईकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या समस्येला सामोरे जाण्यास तयार होतील. गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून सूर्यमार्ग तुमच्यासाठी चांगला राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
सूर्य संक्रमणामुळे तुमचे व्यावसायिक जीवन प्रगती करेल. या काळात तुमचे उत्पन्न चांगले राहील. तुम्ही तुमच्या संवादकौशल्याचा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेने वापर कराल. या राशीचे लोकं सल्लागार, व्याख्याते, मीडिया रिपोर्टर किंवा अशा कोणत्याही व्यवसायात काम करतात त्यांना फायदा होईल. तुम्ही तुमच्या भावंडांसोबत छोट्या अंतराच्या सहलीलाही जाऊ शकता.
कन्या राशीतील सूर्याचे संक्रमण तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रगती कराल. नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती किंवा पगारवाढीची आशा असलेल्या लोकांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. सरकारी व्यवहार किंवा व्यवसायात गुंतलेल्या लोकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. मागील वर्षातील तुमच्या मेहनतीचे ठोस परिणाम दिसून येतील आणि नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ सहकाऱ्यांकडून तुम्हाला आदर मिळेल.
तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसह किंवा लहान भावंडांसोबत कुठेतरी तीर्थयात्रेला जाण्याचा विचार करू शकता. हे संक्रमण पीएचडी करणार्या किंवा पदव्युत्तर पदवी करणार्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. सूर्याची दृष्टीही तुमच्या बचतीत वाढ होण्याचे शुभ संकेत देत आहे. सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी रविवारी मंदिरात डाळिंब दान करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)