Sun Transit: आजपासून पालटणार या सहा राशींचे भाग्य, अनुभवतील राजासारखे आयुष्य

| Updated on: Jan 14, 2023 | 9:19 AM

ग्रहांचा राजा सूर्य आज मकर राशीत प्रवेश करणार आहे. याचा सर्वच बारा राशींवर परिणाम होणार आहे. तुमच्या राशीवर काय परिणाम होणार आहे जाणून घेऊया.

Sun Transit: आजपासून पालटणार या सहा राशींचे भाग्य, अनुभवतील राजासारखे आयुष्य
सुर्याचे संक्रमण
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, आज म्हणजेच 14 जानेवारी रोजी ग्रहांचा राजा भगवान सूर्य धनु राशीतून मकर राशीत जाईल. यामुळे खरमास संपतील आणि लग्नासारख्या शुभ कार्यावरील बंदीही संपेल. सूर्याचे हे संक्रमण (Sun Transit) मीन, मकर, धनु, तूळ, सिंह आणि मेष राशीसाठी भाग्याचे ठरणार आहे, तर वृषभ आणि कन्या राशीच्या लोकांचा खर्च वाढेल. आता सविस्तर जाणून घ्या की, कोणत्या राशीसाठी सूर्य गोचर भाग्यवान असेल आणि कोणाला सावधगिरी बाळगावी लागेल.

मेष-

सूर्याच्या या मार्गक्रमणामुळे तुमचा पगार वाढू शकतो आणि बढती मिळू शकते . कायदा, यांत्रिक अभियांत्रिकी आणि राज्यशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात सकारात्मक परिणाम मिळतील. व्यावसायिक जीवनातही सुधारणा होईल आणि वेगळी ओळखही निर्माण होईल.

वृषभ-

नातेसंबंधांच्या बाबतीत तुम्हाला अनेक उलथापालथीतून जावे लागेल. पालकांशी विचार जुळणार नाहीत. दैनंदिन जीवनात खर्च वाढू शकतो. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करू शकता.

हे सुद्धा वाचा

मिथुन-

या मार्गक्रमणामुळे तुमचे काही रहस्य उघड होऊ शकते. शत्रूंपासून सावध राहा. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात.

कर्क-

करिअरमध्ये सरासरी गतीने पुढे जाल. कामाच्या ठिकाणी शत्रू अचानक सक्रिय होतील आणि तुमच्या कार्यात अडचणी निर्माण करू शकतात. अधिकारी आणि सहकाऱ्यांशीही संबंध बिघडू शकतात. वैवाहिक जीवनात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सिंह-

या दिवशी सूर्य सहाव्या भावात प्रवेश करेल. हे घर कर्ज, शत्रू आणि रोगाचे आहे. परिस्थिती तुमच्या अनुकूल राहील. शत्रूंचे मनसुबे यशस्वी होणार नाहीत. जुन्या कर्जातून सुटका होऊ शकते. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना सन्मान मिळेल.

कन्या-

अनावश्यक खर्चाला आवर घाला. मुलांना परदेशात शिकण्याची संधी मिळू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून हा कालावधी तुमच्यासाठी सरासरी असेल.

तूळ-

तूळ राशीच्या लोकांसाठी सूर्य संक्रमणाचा हा काळ अनुकूल राहणार आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. विविध स्रोतांमधून तुमचे उत्पन्न वाढेल. बचत करण्यात यश मिळेल. घरातील वडिलधाऱ्यांच्या मदतीने तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. गुंतवणूक करण्यापूर्वी सल्ला घ्या.

वृश्चिक-

हा काळ तुमच्यासाठी चांगला राहील. शेजाऱ्यांव्यतिरिक्त भावंडांशीही संबंध सुधारतील. दळणवळणही सुधारेल. करिअरमध्ये अधिक मेहनत कराल, ज्याचे चांगले परिणामही दिसून येतील.

धनु-

या दरम्यान तुम्ही तुमच्या वडिलांची मदत घेऊ शकता. राजकारणात सक्रिय लोकांसाठी हा काळ चांगला राहील. या काळात तुम्हाला आर्थिक लाभही मिळतील. पैसे मिळवण्याच्या अनेक संधी मिळतील आणि उत्पन्नही वाढेल.

मकर-

जोडीदार किंवा वडिलांशी मतभेद होऊ शकतात. तथापि, तुम्ही तुमच्या करिअरमध्ये वेगळ्या स्थान निर्माण करू शकता. अचानक प्रसिद्धी मिळेल. सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील.

कुंभ-

कुंभ राशीच्या लोकांच्या दाम्पत्य जीवनात सूर्याचे भ्रमण अडचणी वाढवू शकते. व्यावसायिक जीवनात आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. काही चांगल्या संधीही तुमच्या हातून जातील.

मीन-

या काळात तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. तुम्हाला प्रमोशनही मिळू शकते आणि तुमच्या करिअरमध्ये नवीन उंची गाठण्याची संधी मिळेल. सामाजिक आणि आर्थिक लाभही मिळू शकतात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)