बुध आणि सूर्यामुळे राशीचक्रात मोठा उलटफेर, दोन दिवसांनी या राशीच्या जातकांना मिळणार नशिबाची चावी

| Updated on: Jul 14, 2023 | 6:26 PM

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचं असं अस्तित्व आहे. असं असताना काही ग्रहांचं एकमेकांशी पटतं. तर काही ग्रहांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे. असेच दोन मित्र ग्रह कर्क राशीत एकत्र येणार आहेत.

बुध आणि सूर्यामुळे राशीचक्रात मोठा उलटफेर, दोन दिवसांनी या राशीच्या जातकांना मिळणार नशिबाची चावी
बुध आणि सूर्याची अशी स्थिती तीन राशीच्या जातकांना फळणार, काय ते वाचा
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रात दररोज काही ना घडामोडी घडत असतात. ग्रहाची हालचाल बरंच काही घडवून जाते. गोचर कुंडलीत ग्रहांची स्थिती खुपच महत्त्वाची ठरते. ग्रहांचा गोचर कालावधी कमी अधिक असल्याने अनेकदा एकापेक्षा जास्त ग्रह एकाच राशीत येतात. त्यामुळे शुभ अशुभ योगांची स्थिती निर्माण होते. अशीच काहीसी स्थिती कर्क राशीत निर्माण होत आहे. बुद्धी आणि वाणीवर नियंत्रण ठेवणारा बुध ग्रह कर्क राशीत आहे. 8 जुलै 2023 रोजी बुध ग्रहाने कर्क राशीत एन्ट्री मारली आहे. त्यानंतर आता दोन दिवसांनी कर्क राशीत सूर्यदेव येणार असल्याने घडामोडींना वेग येणार आहे.

सूर्यदेव 17 जुलै रोजी सकाळी 5 वाजून 19 मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या संक्रमणाला कर्क संक्रांती असं संबोधलं जातं. सूर्याने कर्क राशीत गोचर करताच बुधासोबत युतीमुळे बुधादित्य आणि विपरीत राजयोग तयार होणार आहे. या शुभ योगामुळे तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे.

तीन राशीच्या जातकांना मिळणार लाभ

कर्क : या राशीच्या लग्न स्थानात दोन्ही शुभ योग तयार होत आहेत. त्यामुळे या काळात आत्मविश्वास दुणावलेला राहील. न्यायालयीन प्रकरणात तुमच्या बाजून निकाल येऊ शकतो. बँकिंग, आयात निर्यात क्षेत्रात लाभ दर्शवत आहे. या काळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. अडकलेली सर्व कामं मार्गी लागतील अशी स्थिती आहे.

वृश्चिक : या राशीच्या पाचव्या स्थानात ही युती होत आहे. विपरीत राजयोगामुळे आत्मविश्वासात फरक दिसून येईल. त्यात सूर्याचं पाठबल असल्याने फायदा होईल. बुधादित्य योगामुळे काही अशक्यप्राय कामं पूर्ण करता येतील. नोकरी व्यवसायात भरभराट होईल. आध्यात्मात या काळात रुची वाढेल. संशोधक वृत्ती या काळात वाढलेली दिसून येईल.

मकर : कर्क राशीत बुध आणि सूर्य एकत्र येत असल्याने या राशीच्या सातव्या स्थानात योग तयार होत आहे. त्यामुळे भागीदारीच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तसेच पत्नीकडून उत्तम साथ लाभेल. आत्मविश्वास वाढेल, तसेच कामाचा वेग वाढेल. जुनं कर्ज फेडण्यासाठी योग्य वेळ आहे. शत्रू पक्षावर हावी व्हाल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)