मुंबई- राशीचक्रात ग्रहांचं भ्रमण ठरावीक कालावधीसाठी होत असतं. आपला गोचर कालावधी संपला की ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतो. गोचर कुंडलीनुसार एखाद्या ग्रहाने राशीत प्रवेश केल्यानंतर राशीमंडळातील स्थानावरून आपलं फळ देतो. गोचर कुंडलीनुसार (Gochar Kundali) दुसरं, दहावं आणि अकरावं स्थान महत्त्वाचं असतं. पण इतर स्थानही दैनंदिन आयुष्यात तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे एखाद्या ग्रहाने गोचर केल्यानंतर त्याचा परिणाम पृथ्वीतलावर दिसून येतो. संक्रांतीला सूर्यदेवांनी मकर राशीत प्रवेश केला आहे. या राशीत सूर्यदेव 13 फेब्रुवारीपर्यंत राहाणार आहेत. तर ग्रहांमध्ये राजकुमाराचा दर्जा असलेला बुध ग्रह (Budh Grah) 7 एप्रिलला धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे जवळपास 7 दिवस मकर राशीत बुधादित्य योग असणार आहे. हा योग सर्वात शुभ योग असल्याने काही राशींना फायदा होईल. तीन राशींना या योगाचा फायदा होईल. तसेच अडकलेली कामं या काळात पूर्ण होतील. बुधादित्य राजयोगामुळे करिअर, गुंतवणुकीतून फायदा आणि मान-सन्मान मिळेल. चला जाणून घेऊयात कोणत्या तीन राशींना फायदा होईल ते…
वृश्चिक (Vrushchik Rashi): या राशीच्या तिसऱ्या स्थानात बुधादित्य योग तयार होत आहे. या काळात तुम्हाला मोठं पद मिळण्याची शक्यता आहे. तसेच मानसन्मान देखील या काळात मिळेल. सूर्यदेव ग्रहमंडळाचे राजे आहेत. त्यामुळे तिसऱ्या स्थानात सूर्यदेव आणखी बळवान होतात. त्यामुळे राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांना फायदा होऊ शकतो. तसेच भावंडांकडून चांगली साथ मिळेल. असं असलं तरी आपल्या वाणीवर या काळात नियंत्रण ठेवा. कोणाचंही मन विनाकारण दुखवू नका.
सिंह (Sinha Rashi): या जातकांच्या पाचव्या स्थानात बुधादित्य योग तयार होत आहे. या काळात मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. मुलांच्या कतृत्वामुळे समाजात तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. नोकरी करणाऱ्यांना या काळात पदोन्नती मिळू शकते. तसेच प्रेमसंबंधात यश मिळू शकते. जे जातक बाळासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना संतान प्राप्ती होण्याची शक्यता आहे.
कर्क (Kark Rashi): या राशीच्या सहाव्या स्थानात बुधादित्य योग तयार होत आहे. या स्थानात बुध आणि सूर्य दोघंही बळवान असतात. त्यामुळे या काळात न्यायालयीत प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. त्याचबरोबर जुनाट आजारातून मुक्तताही होऊ शकते. विनाकारण त्रास देणाऱ्यांना या काळात तुमच्याकडून चांगलाच धडा मिळेल. तसेच आर्थिक स्थितीही या काळात चांगली राहील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)