मुंबई : ग्रहमंडळात ग्रहांची स्थिती तशीच राहत नाही. ठराविक कालावधी एका राशीत ठाण मांडल्याने दुसऱ्या राशीत गोचर करतात. या गोचरामुळे राशीचक्राची गणितं बदलून जातात. काल परवा अनुकूल असलेला ग्रह प्रतिकूल स्थितीत येतो. त्यामुळे काही राशीच्या जातकांना त्रास सहन करावा लागू शकतो. तर राशींना अनुकूल परिणाम भोगावे लागतात. नुकताच सूर्याने स्वरास असलेल्या सिंह राशीत प्रवेश केला आहे. यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येत आहे. सूर्याची बुधासोबत युती झाल्याने बुधादित्य योग तयार झाला आहे. तसेच धनराज योगाची स्थितीही निर्माण झाली आहे. त्यामुळे तीन राशीच्या जातकांना अचानक धनलाभ किंवा प्रगतीची दारं खुली होण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशींबाबत…
मेष : या राशीच्या जातकांना सूर्याच गोचर फलदायी ठरू शकतो. कारण बुधादित्य आणि धनराज योगामुळे भरभराट होऊ शकते. नोकरी आणि उद्योगधंद्यात चांगली प्रगती दर्शवत आहे. तसेच काही अडकलेली कामं पूर्ण होताना दिसतील. काल परवापर्यंत ज्या लोकांनी पाठ फिरवली होती. ते लोकंही तुमचं म्हणणं ऐकतील. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी चांगला असणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होईल. प्रेमप्रकरणात सकारात्मक बदल दिसून येतील. कदाचित घरच्यांकडून हिरवा कंदील मिळू शकतो. जवळच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा योग जुळून येईल.
वृषभ : बुधादित्य आणि धनराजयोग या राशीच्या जातकांना फलदायी ठरू शकतो. या कालावधीत केलेली गुंतवणूक चांगल्या प्रकारे फळेल. प्रॉपर्टी खरेदीचा योग जुळून येईल. कोणत्याही प्रकारच्या देवाण घेवाणीतून आर्थिक फायदा होऊ शकतो. या काळावधीत भौतिक सुख अनुभवता येईल. व्यापार आणि नोकरीच्या ठिकाणी अनुभवी लोकांकडून मोलाचा सल्ला मिळेल. बेरोजगार असलेल्या तरुणांना संधी चालून येतील. समाजात मानसन्मान मिळेल. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या लोकांना दिलासा मिळेल.
सिंह : या राशीच्या जातकांना बुधादित्य योग आणि धनराजयोगाचा फायदा होईल. कारण सूर्यदेव लग्न राशीतच गोचर करत आहेत. त्याच स्वामी ग्रह असल्याने घरच्या मैदानावर चांगला निकाल दिसेल. आत्मविश्वासात दुपटीने वाढ होईल. आतून ऊर्जा प्राप्त झाल्याचं दिसून येईल. नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. कामाच्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा प्रभाव दिसून येईल. जोडीदारासोबत काही कारणामुळे वाद होऊ शकतात. पण डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर ठेवली आहे, असं वागा. म्हणजे वाद होणार नाहीत.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)