मुंबई : राज्यात (Increase in crime) गु्न्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचा आरोप विरोधकांकडून सभागृहात करण्यात आला होता. यावर (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण तर दिलेच पण गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य काय उपाययोजना राबवल्या आहेत त्याचा उहापोह केला. शिवाय प्रभावी अंमलबजावणीमुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी होत असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. यातच (Dance bar) डान्सबार सुरु असल्याची एक जुनी क्लिप व्हायरल होत असल्याचे सांगत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेतले. आणि त्यांना हे सर्व माहित आहे असे म्हणताच सभागृहात एकच हशा उमटला..यावर आव्हाड यांनीही लागलीच आक्षेप घेतला पण याबाबत आपण काही वाईट बोलत नसल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.
राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. केवळ एक अशा नाहीतर सर्वच गुन्ह्यामंध्ये वाढ होत असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले होते. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात काय स्थिती आहे याचा दर्शनच घडवून दिले तर जिथे गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत तिथे योग्य त्या सूचनाही दिल्या जाणार असल्याचे ते म्हणाले, मात्र हे सांगत असताना डान्सबार तर बंद आहेतच पण मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांच्या नावाचा उल्लेख करुन त्यांना सर्व माहित असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे सभागृहात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये हशा झाला.
डान्सबारचा विषय निघताच मुख्यमंत्र्यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेतले. त्यामुळे समोरील बाकावर असलेले आव्हाड चांगलेच संतापले होते, पण यावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले की, तुम्हाला केवळ माहिती आहे असं म्हटलं मी…तर जाता कुठं असं सांगितले, यावर आव्हाड हे संतपालेलेच होते पण चांगलेही सांगायचे अवघड झाल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यानी दुसऱ्या विषयाला हात घातला.
राज्यातील डान्सबार हे बंद आहेत अशी माहिती देत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा हवाला देत त्यांना हे माहिती असल्याचे सांगितले, पण आव्हाड चांगलेच संतापले होते. चांगल बोलणेही वाईटच आहे, मग वाईट बोलू..दुसरं सांगू येथे सर्वांना असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे डान्सबार आणि त्याला जोडूनच आव्हाड यांचे घेतलेले नाव याबरोबरच गुन्हगारीवरील स्पष्टीकरणही संपले.