शुक्राचे संक्रमण
Image Credit source: Social Media
मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) शुक्र हा सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, प्रेम इत्यादींचा कारक मानला जातो. यामुळे शुक्राचे संक्रमण (Transit of Venus) सर्व ग्रहांच्या जातकांवर परिणाम करते आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतात. शुक्रवार, 11 नोव्हेंबर रोजी हा ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करेल. मंगळाच्या राशीत शुक्राच्या प्रवेशामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. भौतिक सुख वाढण्याची शक्यता आहे. शुक्र कोणत्याही राशीमध्ये 23 दिवस राहतो. येत्या 23 दिवसात कोणत्या राशीच्या लोकांना विशेष फायदा होणार आहे याबद्दल जाणून घेऊया.
- मेष- मंगळ मेष राशीचा स्वामी आहे आणि शुक्र वृश्चिक राशीत भ्रमण करत आहे. या राशीसाठी हे संक्रमण शुभ सिद्ध होईल. या काळात तुम्हाला अचानक काही मोठा फायदा होऊ शकतो. म्हणजेच तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती, आकस्मिक लाभ किंवा अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. सरकारी नोकऱ्यांशी संबंधित लोकांनाही फायदा मिळेल. या दरम्यान गुंतवणुकीचा फायदाही होईल आणि तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. अनेक स्त्रोतांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल.
- तूळ- या राशीचा राशिस्वामी शुक्र आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळाच्या घरात भ्रमण करत आहे. या संयोगामुळे तुमचा प्रभाव वाढेल, नेतृत्व क्षमतेमुळे तुम्हाला फायदा होईल आणि उत्पन्नात अचानक वाढ होऊ शकते. गुंतवणुकीसाठीही हा काळ अनुकूल राहील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. सुविधांशी संबंधित वस्तूंच्या खरेदीत खर्च होण्याची शक्यता आहे. घरापासून दूर जाण्याची किंवा परदेशात जाण्याचीही शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.
- वृश्चिक- तुमच्या राशीचा स्वामी मंगळ असून शुक्र मंगळाच्या राशीत भ्रमण करत आहे. यामुळे शुक्राचे हे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल. व्यवसायात चांगला नफा मिळेल. यासोबतच पैसे कमावण्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे खूप कौतुक होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन देखील आनंदाने भरलेले असेल. कोर्ट केसेसमध्ये यश मिळेल.
- मकर- मकर राशीसाठी मंगळ हा चौथ्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. म्हणजेच नोकरीशी संबंधित उत्पन्न वाढेल. नोकरी शोधणाऱ्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. तुम्हाला विविध स्रोतांमधून उत्पन्न मिळेल आणि मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित लाभ होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुम्ही घर किंवा वाहन देखील खरेदी करू शकता.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)