Angarak Yog : मंगळ आणि केतुची अशुभ युतीही तीन राशींना फळणार, जाणून घ्या कसा पडेल प्रभाव ते

| Updated on: Oct 02, 2023 | 5:54 PM

Mangal Ketu Yuti : ज्योतिषशास्त्रात ग्रहांचं गोचर खूप महत्त्वाचं असतं. कारण ग्रहांची स्थिती राशीचक्रावर परिणाम घडवून आणत असते. तूळ राशीत 27 दिवसांसाठी मंगळ आणि केतुची युती होत आहे. हा अशुभ योग काही राशींना फळणार आहे.

Angarak Yog : मंगळ आणि केतुची अशुभ युतीही तीन राशींना फळणार, जाणून घ्या कसा पडेल प्रभाव ते
Angarak Yog : मंगळ आणि केतुची 27 दिवसांसाठी अभद्र युती, तीन राशींना जबरदस्त फायदा देणार
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतात. काही ग्रह दीर्घकाळ एका राशीत ठाण मांडून बसतात. तर काही ग्रह अल्पवधीतच राशी बदल करतात. त्यामुळे राशीचक्रात ग्रहांच्या शुभ अशुभ युती पाहायला मिळते. अवघ्या काही तासात म्हणजेच 3 ऑक्टोबरला मंगळ ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. 16 नोव्हेंबरपर्यंत मंगळ या राशीत असणार आहे. तर केतु हा ग्रह तूळ राशीत दीड वर्षांपासून आहे. 30 ऑक्टोबरला दीड वर्षांचा कालावधी संपुष्टात येईल आणि कन्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे 27 दिवस मंगळ आणि केतुची युती पाहायला मिळणार आहे. मंगळ आणि केतु ही अशुभ युती असून याला अंगारक योग असं संबोधलं जातं. पण या अशुभ युतीतही तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार आहे. कारण मंगळ केतुवर भारी असणार आहे. चला जाणून घेऊयात तीन राशींबाबत…

तीन राशीच्या जातकांना लाभ मिळणार

कन्या : या राशीच्या जातकांना मंगळ आणि केतुची युती फलदायी ठरणार आहे. ही युती धनभावात होणार आहे. त्यामुळे अचानक धनलाभ होऊ शकतो. त्या सोबत आर्थिक स्थिती या कालावधीत सुधारेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेला पैसा परत मिळू शकतो. आत्मविश्वास दुणावलेला राहील. मीडिया, शिक्षण आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांना लाभ मिळेल.

कुंभ : या राशीच्या नवव्या स्थानात मंगळ आणि केतुची युती तयार होत आहे. यामुळे नशिबाची जोरदार साथ मिळेल. गेल्या काही दिवसांपासून कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. नोकरीची संधी चालून आल्याने भविष्यातील योजना चांगल्या प्रकारे आखाल. विदेश यात्रा करण्याचा योग जुळून येईल. आध्यात्मात रुची वाढेल. नातेवाईकांकडून चांगली साथ मिळेल.

तूळ : या राशीच्या जातकांच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच चेहऱ्यावरील तेज पाहूनच तुमचा एक वेगळा प्रभाव पडेल. समाजातील मोठ्या लोकांशी थेट संबंध येईल. करिअरचे नवे रस्ते खुले होतील. तसेच गेल्या काही दिवसांपासून असलेल्या इच्छा पूर्ण होतील. भौतिक सुखांची प्राप्ती होईल. वाहन किंवा संपत्ती खरेदीचा योग जुळून येईल. नवीन व्यवसाय या काळात सुरु करू शकता. पण विनाकारण पैसा खर्चही होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)