बुधाची वक्री चाल तीन राशींच्या पथ्यावर! 13 डिसेंबरनंतर नशिब फळफळणार

| Updated on: Dec 07, 2023 | 8:42 PM

ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा स्वभाव आणि फलश्रूती सांगण्यात आली आहे. काही ग्रह उग्र, तर काही ग्रह सौम्य स्वरुपाचे आहेत. त्याच बुध ग्रहही त्यापैकीच एक आहे. सौम्य आणि सूर्याच्या जवळ असल्याने स्थितीत बदल होत असतो. बुध ग्रहाची 13 डिसेंबरनंतरची स्थिती तीन राशींना फलदायी ठरणार आहे.

बुधाची वक्री चाल तीन राशींच्या पथ्यावर! 13 डिसेंबरनंतर नशिब फळफळणार
बुद्धीदाता बुध ग्रह आपली चाल बदलताच तीन राशींना मिळणार साथ, 13 डिसेंबरनंतर होणार भलं
Follow us on

मुंबई : ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला राजकुमाराचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच सूर्याच्या जवळ असल्याने बुध ग्रहांची स्थिती वारंवार बदलत असते. चंद्रानंतर सर्वात वेगाने राशी बदलणारा ग्रह म्हणूनही बुध ग्रहाची ख्याती आहे. 13 डिसेंबरला बुध ग्रह वक्री स्थितीत असणार आहे. बुधाची ही स्थिती 13 डिसेंबरला 12 वाजून 38 मिनिटांनी सुरु होईल आणि 2 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8 वाजून 36 मिनिटांपर्यंत राहील. म्हणजेच बुध ग्रह जवळपास 20 दिवस अशा स्थितीत असणार आहे. त्यामुळे काही राशींना लाभ तर काही राशींना फटका बसणार आहे. मेष, कर्क आणि सिंह राशीच्या जातकांना या कालावधीत जपून राहावं लागेल. तर राशीचक्रातील तीन राशींना लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊयात कोणत्या तीन राशींना फायदा होणार ते…

मीन : या राशीच्या जातकांना साडेसातीचा पहिला टप्पा सुरु आहे. असं असलं तरी बुध ग्रहांची कृपा असणार आहे. बुध या राशीच्या भाग्य स्थानात गोचर करत आहे. त्यामुळे 20 दिवसांचा कालावधी उत्तम जाईल. काही घटना अगदी मनासारख्या घडतील. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा अधिक चांगली राहील. तसेच काही महत्त्वाचे निर्णय घेता येतील. पण आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

वृषभ : बुध ग्रह या राशीच्या सप्तम भावात वक्री होत आहे. हे स्थान जोडीदाराशी निगडीत आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल दिसतील. पत्नीकडून तुम्हाला अपेक्षित साथ मिळेल. आर्थिक घडी व्यवस्थित करण्यात तिची मदत होईल. कौटुंबिक पातळीवर आनंदी वातावरण राहील. त्यामुळे आरोग्यही उत्तम राहील.

कुंभ : या राशीच्या कर्म स्थानात बुध ग्रह वक्री होत आहे. त्यामुळे कामाच्या निगडीत गोष्टींवर सकारात्मक परिणाम होईल. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल. बेरोजगार असलेल्या जातकांना नवी नोकरी मिळू शकते. प्रमोशनची वाट पाहणाऱ्या पदोन्नती मिळू शकते. पगार वाढ होण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात एखादा नवा करार निश्चित होऊ शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)