मुंबई : एखाद्या व्यक्तीच्या जीवनात प्रेम किती आणि केव्हा येईल याबद्दल आपल्याला जोतिषशास्त्राच्या (Astro Tips) आधारे अंदाज व्यक्त करता येतो. शुक्र ग्रह सौर मंडळात सूर्यानंतर दुसरा ग्रह आहे आणि चंद्रानंतर रात्री चमकणारा हा दुसरा ग्रह आहे. शुक्र आकार आणि वस्तुमानाने पृथ्वीसारखाच आहे. शुक्र हा ज्योतिष शास्त्रामध्ये एक पवित्र ग्रह मानला जात आहे. याच्या शुभ परिणामामुळे एखाद्याला भौतिक, शारीरिक आणि वैवाहिक आनंद मिळतो. म्हणून ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह भौतिक सुख, वैवाहिक आनंद, भोग, सौंदर्य, कला, प्रतिभा, प्रणय, वासना आणि फॅशन डिझायनिंग इत्यादी घटकांचा घटक मानला जातो. शुक्र वृषभ आणि तुला राशीचा स्वामी आहे आणि मीन तिचे उच्च राशी आहे, तर कन्या ही त्याची नीच राशी आहेत.
चांदीची किंवा प्लॅटिनमची अंगठी धारण केल्याने शुक्र ग्रह शांत होतो. तसेच नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर ठेवते. अशा प्रकारे तुम्हाला आनंदी आणि शांतीपूर्ण जीवन तर मिळतेच शिवाय तुमचे सौंदर्यही वाढते. त्वचेच्या समस्या स्वतःच निघून जातात. यासाठी करंगळीत चांदीची अंगठी घालावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)